आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार लाखांचा अवैध मद्यसाठा कारसह जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पाथर्डी-वडनेररोडवरराज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत इंडिगाे कारसह गोव्यातील सुमारे चार लाखांचा मद्यसाठा जप्त केला. कारचालक मात्र फरार झाला. सोमवारी (दि. १९) रात्री ११ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.

विभागाचे अधीक्षक प्रसाद सुर्वे, उपअधीक्षक राजेंद्र आवळे, सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. इंडिगो (एमएच १५, एबी २२३२) मधून परराज्यातील मद्य विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाल्याने पाथर्डी-वडनेररोडवर केलेल्या कारवाईत कारमध्ये व्हिस्कीच्या ६० बाटल्या अाढळल्या. मंगेश कावळे, विलास बामणे, उत्तम आव्हाड, अशोक बोडके, मनोहर गरुड, शिवाजी चव्हाणके, गौरव तारे, विष्णू सानप, पोपट बहिरम, वीरेंद्र वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली.