आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Illegal Asaram Bapu Ashram Set Up In Green Belt Of Nashik City

नाशिकच्या हर‍ित पट्टयात परवानगी नसतानाही आसाराम बापूच्या आश्रमाची उभारणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पोल्ट्री फार्म आणि फार्म हाऊसच्या नावाने बांधकामास परवानगी असलेल्या जागेवरच आसाराम बापू यांच्या आश्रमाची उभारणी करण्यात आल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. हरित पट्ट्यात पक्के बांधकाम करता येत नसतानाही सुमारे पाच एकर जागेवरील बांधकाम यामुळे चर्चेत आले असून, महापालिकेच्या नगररचना आणि बांधकाम विभागाने देखील या गोष्टीला पुष्टी दिली आहे.


यौन शोषणप्रकरणी तुरूंगात असलेल्या आसाराम बापू यांचे देशभरातील आश्रम आणि त्यांची साधन संपत्तीविषयीच्या गोष्टी उघड होऊ लागल्या आहेत. नाशिकमध्ये सावरकरनगरसारख्या उच्चभू्र वस्तीत अगदी गोदावरी नदीलगत पाच एकर जागेत आसाराम बापूंच्या आश्रमाची उभारणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर हरित पट्ट्यात (ग्रीन बेल्ट झोन) येतो. यामुळे या ठिकाणी नगररचना विभागाच्या नियमानुसार केवळ फार्म हाऊस अथवा पोल्ट्री फार्मसाठीच परवानगी देता येऊ शकते. त्यामुळे साहजिकच या जागेवर बांधकाम करण्यासाठी देखील या दोन्ही कारणांकरताच परवानगी असताना संबंधीत ठिकाणी मात्र आश्रम थाटण्यात आला आहे.आश्रमातील बहुतांश जागा ही 1990 च्या शहर विकास आराखड्यातील 24 मीटर आणि 18 मीटर डीपीरोडसाठी आरक्षित आहे. त्याबाबत आश्रमाने महापालिकेच्या नगररचना विभागाशी केलेल्या करारानुसार रस्त्यासाठी जागा हस्तांतरीत करण्याचा करार करुन दिलेला आहे. असे असताना मागील सिंहस्थापासून ही जागा अद्यापपर्यंत पालिकेकडे वर्ग करण्यात आलेली नाही.


संचालकांचे मौन, जागा मुलाच्या नावे
आश्रमाच्या आजी- माजी संचालकांनी आपणाला काहीही सांगता येणार नाही. आता आमचा संबंध नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले. देणगी दाखल मिळालेल्या जागा आणि अनेक ठिकाणी बळकावलेल्या जमिनींबरोबरच पूर्वी नाशिकमधीलच एका व्यापा-याकडून अत्यल्प किंमतीत मिळालेल्या या जागेवर हा आश्रम आजमितीस उभा आहे. ही जागा आता आसाराम यांचे चिरंजीव नारायणदास यांच्या नावे असल्याचेही समोर आले आहे.


बांधकाम परवानगी नाहीच
ग्रीन बेल्टमध्ये फार्महाऊस आणि पोल्ट्री फार्म हाऊस व्यतिरिक्त कुठल्याही बांधकामाला परवानगी देता येत नाही. आश्रमाच्या मोठ्या प्रमाणावरील बांधकामाला परवानगी नसू शकते.
संजय घुगे, कार्यकारी अभियंता, नगररचना विभाग