आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढीव बांधकामे कळवा, दंडातून सूट मिळवा; ऑनलाइन घर, पाणीपट्टी भरणाऱ्यांना एप्रिलपासून सूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उत्पन्नवाढीसाठी कसरत करणाऱ्या महापालिकेने आता १० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत घरपट्टी आकारणी होणाऱ्या वाढीव बांधकामाची माहिती कळवण्याचे फर्मान काढले आहे, अशी माहिती देणाऱ्यांना घरपट्टी दंडातून सूट देण्याचे आमिष दाखवण्यात आले असून, जेणेकरून काेणतेही कष्ट करता वाढीव घरपट्टी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

महापालिका क्षेत्रात आजघडीला साडेतीन लाख मिळकती असून, जवळपास एक लाख मिळकती रेकॉर्डवरच नसल्याचे तत्कालीन आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी अंदाज व्यक्त केला होता. दोन वर्षांपूर्वीच शहरातील सर्व मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला. प्रत्यक्षात मक्तेदार निश्चिती अडचणीवर मात करता करता आता काेठे स्थायी समितीवर प्रस्ताव आला आहे. दरम्यानच्या काळात घरपट्टी क्षेत्र दडवणाऱ्यांची माहिती गाेळा करण्यासाठी पालिकेने प्रायोगिक स्तरावर काही सर्वेक्षणे केली, मात्र त्यात घरगुतीएेवजी व्यावसायिक वापर करणाऱ्या मिळकतीशिवाय काही हाती पडले नाही.

दरम्यान, आजघडीला शहरात बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेता अनेक इमारतींत लाेक रहिवास करीत असल्याच्या तक्रारी आहेत. पूर्णत्वाचा दाखला नसल्यामुळे घरपट्टी क्षेत्राची नोंद झालेली नाही. दुसरीकडे पालिकेचे सर्वेक्षण आता काेठे सुरू होण्याच्या तयारीत असून, त्यास लागणारा प्रदीर्घ कालावधी लक्षात घेत किमान दंड आकारणीचे आमिष दाखवून मिळकतधारकांकडून नवीन बांधकामाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न आहे.

त्यासाठी पालिकेने १० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत इमारत वापरातील नवीन बदल वा वाढीव बांधकामाची माहिती कळवण्याचे आवाहन केले आहे. ज्या बांधकामांनी पूर्णत्वाचा दाखला घेतला आहे त्यांनी रहिवासी, वाणिज्य, औद्योगिक वापराबाबत केलेल्या बदलाची माहिती कळवावी. तशी माहिती कळवल्यास त्यानंतर सर्वेक्षणात वाढीव क्षेत्र आढळून आल्यास दंड लावला जाणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्णा उपआयुक्त राेहिदास दोरकुळकर यांनी स्पष्ट केले.

नोव्हेंबरपासून ऑनलाइन घरपट्टी पाणीपट्टी भरणाऱ्या नाशिककरांना टक्का सूट देण्याची याेजना पालिकेने जाहीर केली होती. आता महापालिकेने एप्रिलपासून ऑनलाइन घरपट्टी पाणीपट्टी भरणाऱ्यांना टक्का सूट देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली. एप्रिल महिन्यापासून ज्यांनी ऑनलाइन घरपट्टी भरली असेल त्यांना टक्का वा ५०० रुपयांपर्यंत सवलत लागू होईल. आधीच रक्कम भरली असल्यामुळे सवलतीची रक्कम अतिरिक्त दाखवून पुढील वर्षी समायाेजित होईल. पाणीपट्टीबाबतही असेच असून, अर्धा टक्का किंवा जास्तीत जास्त १०० रुपयांपर्यंत सवलत मिळेल. ही सवलतही पुढील वर्षी समायाेजित होईल. ऑनलाइन पद्धतीने कर भरणा करणाऱ्यांसाठी नेटबँिकंग, डेबिट आणि क्रेडिट कार्डची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...