आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सुंदर नाशिक’ संकल्पनेला हाेर्डिंग्जबाजांचा काळिमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ या संकल्पनेलाच काळिमा फासणार्‍या हाेर्डिंग्जबाजांनी शहर िवद्रुपीकरणाचा जणू ठेकाच घेतला आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे शहर साैंदर्यीकरणासाठी प्रशासनाची धडपड सुरू असताना ठिकठिकाणी अनधिकृत हाेर्डिंग्ज, माेठमाेठे फलक लावून महापालिका प्रशासनाला आव्हान दिले जात आहे. विशेष म्हणजे, उच्च न्यायालयाने महापालिकेला थेट गृन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असतानाही सर्रास होर्डिग्ज लावल्या जातात. यामुळे जाहिरात कराद्वारे मिळणार्‍या उत्पन्नावरही महापालिकेला पाणी सोडावे लागत आहे. या प्रकारावर ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझाेत...
शहराचा कोणत्याही भागात, अगदी छाेट्याशा एखाद्या गल्लीतल्या कोपर्‍यापासून तर चौकापर्यंत फलकांचा भडिमार झालेला सध्या दिसून येत आहे. भाऊ, दादा, अण्णा यांना शुभेच्छा देणारा फलक असो वा निधन झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लावलेला फलक असाे, या सर्व फलकांमुळे शहर साैंदर्यीकरणाच्या मूळ संकल्पनेलाच वाकुल्या दाखवल्या जात आहेत. विद्रुपीकरणात भर घालणार्‍या अशा अनधिकृत फलकांच्या विरोधात मनपा प्रशासनाला उच्च न्यायालयाने फटकारत असे फलक लावण्यार्‍यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचेही आदेश दिले होते. मात्र, तरीदेखील पालिका प्रशासनाकडून कारवाई हाेत नसल्याने आता या फलकबाजी करणार्‍यांनाही कारवाईची भीती राहिली नाही. शहर हाेर्डिंगमुक्त करण्यासाठी टाेल फ्री क्रमांकही तयार करण्यात आले आहेत. मात्र, यावर फाेन करणार्‍या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचीच तक्रार नागरिकांनी ‘डी.बी. स्टार’कडे केली आहे.

जाहिरातकरांवर पाणी...
शहरात जाहिरात, फलक लावण्यासाठी मनपा प्रशासनाद्वारे विविध ठिकाणी ७२ जाहिरात कमानी लावण्यात आलेल्या आहेत. या जाहिरात कमानी तयार करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला. मात्र, शहरात अनधिकृत फलकांच्या विरोधात कारवाईच होत नसल्याने या जाहिरात कमानीचा उद्देश निष्फळ ठरत आहे. जाहिरात कमान केवळ शोभेपुरतीच राहिली आहे. एकीकडे महापालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली असताना घरपट्टी, पाणीपट्टी कर वाढवून नागरिकांवर आर्थिक भार लादला जातो. मात्र, जाहिरात कराद्वारे मिळणार्‍या या माेठ्या उत्पन्नावर मनपाच्याच िनष्काळजीपणामुळे पाणी सोडावे लागत आहे.

आतापर्यंत केवळ ४० गुन्हे दाखल
शहरात कोणत्याही प्रकारची परवानगी घेता फलक लावणार्‍यांच्या विरोधात मनपाच्या अतिक्रमण विभागाने आतापर्यंत केवळ ४० गुन्हे दाखल केले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये थेट गुन्हे दाखल केले जात असतानाही फलकबाजीवर आळा बसविण्यात मनपा प्रशासन अपयशीच ठरले आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ संकल्पना राबविण्यासाठी या अनधिकृत फलकबाजी विरोधात विशेष माेहीम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

येथे नेहमीच विळखा...
- निमाणी बसस्थानक परिसर - नाशिकराेड रेल्वेस्थानक - शिवाजी महाराज पुतळा परिसर - सातपूर - द्वारका - आडगाव नाका - रविवार कारंजा - अशाेक स्तंभ - सीबीएस - त्र्यंबक नाका - नांदूर नाका - गंजमाळ सिग्नल - आनंदवली - सिडकाे - पवननगर - उत्तमनगर - राणेनगर - पाथर्डी फाटा - अंबड गाव - उपेंद्रनगर - डीजीपीनगर - अशाेकनगर - श्रमिकनगर स्टाॅप

लहान मुलांचेही शुभेच्छा फलक
याफलकबाजीला सीमाच उरली नसल्याची अनेक उदाहरणे ‘डी.बी. स्टार’ने केलेल्या पाहणीत समाेर आली आहेत. विशेष म्हणजे, अगदी एक वर्षाच्या मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे अनेक फलक सर्रासपणे चाैकाचाैकांत झळकविले जात असल्याचे दिसून आले. काहीही समजणार्‍या या लहान मुलांचाही या चकमोगिरीमध्ये समावेश केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पाेलिसांचीही भूमिका बघ्याचीच...
शहरअनधिकृत फलकबाजींच्या विळख्यात अडकले असतानाही हाेर्डिंगबाजीवर कारवाई करण्यात पालिका प्रशासन अपयशीच ठरत आहे. पाेलिस प्रशासनाकडूनही या फलकबाजीकडे साफ दुर्लक्षच केले जात आहे. विशेष म्हणजे, या फलकांवर गुंड प्रवृत्तींचे चेहरे झळकत असतानाही त्यािवराेधात पाेलिस प्रशासनाकडून काेणत्याही प्रकारच्या कारवाईचे पाऊल उचलले जात नाही. कारवाई केलीच तर अज्ञात नावानेच गुन्हा दाखल केला जात असल्याने संबंधितांवर थेट कारवाई हाेत नाही.

सहाही विभागीय अधिकार्‍यांना थेट गुन्हे दाखल करण्याचा अधिकार
महापालिकेच्या सिडकाे, नाशिकराेड, पंचवटी, सातपूर, पूर्व, पश्चिम अशा सर्व सहाही विभागांतील विभागीय अधिकार्‍यांना उच्च न्यायालयाकडून शहरात अनधिकृत फलक लावणार्‍यांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. शहरातील वाढत्या फलकांच्या विरोधात या विभागीय अधिकार्‍यांनी कठाेर भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून शहर साैंदर्यीकरणाचे स्वप्न लवकरच साकार हाेईल. मात्र, तरीदेखील या विभागीय अधिकार्‍यांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई हाेत नसल्याने फलकांचा विळखा कमी हाेताना दिसून येत नाही.

वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न
आगामीसिंहस्थ कुंभमेळा, तसेच अवघ्या दीड-दोन वर्षांवर आलेली नगरसेवकपदाची निवडणूक यामुळे शहरात सध्या भलेमोठे फलक लावून वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे अनेकदा फलक लावण्यावरून, फलकावरील नावावरून, फोटोवरून वाद निर्माण होऊन हाणामारीचे प्रसंगही घडत आहेत. यामुळे शहरातील गुन्हेगारीत भर पडत असल्याने पोलिस प्रशासनानेदेखील या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

अनधिकृत फलकांच्या विरोधात प्रशासनाकडून ‘टोल फ्री’ क्रमांकही
शहरातलावल्या जाणार्‍या फलकांच्या विरोधात प्रशासनाकडून टोल फ्री क्रमांक १८००२३३१९८२ १८००२३३३४७१ तसेच ९४२३१७९०९७ हा एसएमएस क्रमांकही देण्यात आला आहे. या क्रमांकावर अनधिकृतपणे लावल्या जाणार्‍या फलकांविरोधात तक्रार केल्यास प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. तसेच, मनपाच्या सहाही विभागात विभागीय अधिकार्‍यांच्या अधिपत्याखाली ‘सिटिजन फोरम’ची स्थापना केली आहे. या सिटिजन फाेरमद्वारे अनिधकृत फलकांबाबतची माहिती प्रशासनाला कळवली जाते. मात्र, या उपाययोजनाही पूर्णत: फाेल ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

थेट प्रश्न : रोहिदास बहिरम, अतिक्रमण उपायुक्त, नाशिक महापालिका
प्रश्न : शहरात ठिकठिकाणी सर्रासपणे अनधिकृत होर्डिग्ज उभारले जात आहेत. त्यांच्यावर कारवाई का हाेत नाही?
- शहरातसार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणार्‍या अनधिकृतपणे होर्डिग्जविरोधात अतिक्रमण विभागाची कारवाई सुरूच असते. माेहीम राबवून हे अनिधकृत फलक तातडीने हटविण्यात येतात.
प्रश्न : अनधिकृतपणे होर्डिग्ज लावणार्‍यांविरोधात काय कारवाई केली जाते?
- प्रशासनाचीकोणत्याही प्रकारची परवानगी घेता होर्डिग्ज लावणार्‍यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येतात. यासाठी विभागीय अधिकार्‍यांना विनापरवानगी गुन्हे दाखल करण्याचे आदेश िदलेले आहेत.
प्रश्न : शहर हाेर्डिंगमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत?
- यासाठीप्रशासनाकडून प्रत्येक विभागात सिटिझन फाेरमची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, टोल फ्री एसएमएस क्रमांकही आहेत. त्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारी पडताळून तातडीने हाेर्डिंग्ज लावणार्‍यांविराेधात कारवाई करण्यात येते.
बातम्या आणखी आहेत...