आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातास कारणीभूत ठरणारे हाेर्डिंग्ज हटवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने नाशिक शहरातील विविध माेक्याच्या ठिकाणी उभारलेल्या अनधिकृत हाेर्डिंग्जसह रस्ता दुभाजकांच्या अातमध्ये लावण्यात अालेले हाेर्डिंग्ज गुरुवारी (दि. २१) हटविले. यामुळे शहराच्या साैंदर्यात भर तर पडलीच, शिवाय लहान-मोठ्या अपघाताची शक्यताही कमी झाल्याने वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले अाहे.
शहराच्या विविध भागांमधील माेक्याच्या ठिकाणांवर अनधिकृत हाेर्डिंग्ज उभारून शहराच्या साैंदर्याला बाधा पाेहोचविण्याचे काम राजकीय पुढाऱ्यांसह भाई, अण्णा, नाना, भाऊ, अाप्पा मंडळींकडून केले जात हाेते. मुख्य रस्त्याच्या चाैकासह वाहतूक बेटे, दुभाजक माेक्याच्या जागा अनधिकृत हाेर्डिंगने व्यापल्या जात हाेत्या.

काेणाच्याही वाढदिवसाला हाेर्डिंग उभारण्याची जणू स्पर्धाच सुरू हाेती. इच्छा नसतानाही नागरिकांना नाइलाजास्तव राजकीय पुढाऱ्यांसह भाऊ, नाना, अण्णा, अाप्पा, भाई अशा स्वयंघाेषित नेत्यांची छबी बघावी लागत हाेती. या हाेर्डिंग्जमुळे रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनधारकांना पलीकडच्या बाजूची वाहने दिसत नसल्याने नेहमीच छाेटे-माेठे अपघात घडत हाेते. शहराला बकाल स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या अनधिकृत हाेर्डिंग्जविरुद्ध रतन लथ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. त्यानुसार न्यायालयानेही अनधिकृत हाेर्डिंग काढण्याचे निर्देश दिले हाेते. मात्र, या निर्देशांची प्रत्यक्षात अंमलबजावणी हाेत नव्हती.
अनेक अास्थापनांनी लाखाे रुपये खर्च करून शहरातील काही वाहतूक बेटे चाैकांचे सुशाेभीकरण केले हाेते. अशा चाैकांमध्ये वाहतूक बेटांवरदेखील एक हजार रुपये खर्च करून स्वत:ची छबी झळकविण्याच्या प्रकारात वाढ झाली हाेती. पालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी यासंदर्भात कठाेर भूमिका घेऊन सर्व अनधिकृत हाेर्डिंग्ज काढण्याचे अादेश दिल्याने पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कधी नव्हे एवढी जाेरदार माेहीम सध्या अनधिकृत हाेर्डिंगच्या बाबतीत सुरू केल्याने वाहतूक बेटांसह मुख्य चाैक सध्या माेकळा श्वास घेत अाहेत. या धडक कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले अाहे.

आता अधिकृत ठिकाणांवरच हाेर्डिंग्ज लावता येणार
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या या ‘होर्डिंग हटाव’ माेहिमेत शहरातील विविध ठिकाणच्या सुमारे १४५ अनधिकृत हाेर्डिंग्ज काढण्यात अाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, जाहिरातदारांसाठी महापालिकेने स्वत: हाेर्डिंग्जसाठी ठिकठिकाणी जागा उपलब्ध करून दिली अाहे. त्यामुळे यापुढे शहरात फक्त अधिकृत ठिकाणांवरच हाेर्डिंग्ज उभारता येणार अाहे.