आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बनावट कागदपत्रांद्वारे बळकावला भूखंड; फसवणुकीचा गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ओळखीचा वापर करून प्लॉटची माहिती घेत तो बळकाविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात संशयिताने फेसबुकवरील छायाचित्राचा आधार घेत खरेदीचा व्यवहार केल्याचेही तक्रारीत म्हटले असून, इगतपुरी पोलिसांत अजीम अब्दुल लतिफ हाजू विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

नितीन पद्माकर पंडित (रा. नाशिकरोड) यांच्या तक्रारीनुसार, तळेगाव बुद्रुक (ता. इगतपुरी) येथे गट नंबर 407 मधील 1100 चौरस मीटरच्या त्यांच्या प्लॉटसमोर हाजूचा लघुउद्योग असून, त्याने बनावट कागदपत्रांद्वारे 20 लाखांत या प्लॉटचा व्यवहार झाल्याचे दर्शविले. संशियत हा कॉँग्रेस नेत्याचा नातलग असल्याने पोलिसांवर दडपण असल्याचा संशय तक्रारदाला होता. पोलिस अधीक्षकांकडे तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला.