आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गावर रात्री उशिरा मद्यविक्री, पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल आणि ढाब्यांवर रात्री उशिरा मद्यविक्री होत असल्याने महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महामार्गावर अवैध मद्यविक्री होत असूनही राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिस विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे आजवरच्या घडलेल्या अपघातांच्या अाकड्यांवरून निदर्शनास येत आहे. महापुरुषांची जयंती आणि सणोत्सवाच्या काळात या परिसरात जणू जत्राच भरत असल्याचे चित्र पाहावयास मिळते.
मुंबई-आग्रा महामार्गावरील काही हॉटेल आणि ढाब्यांवर मद्यविक्री केली जाते. रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी असूनही बहुतांश हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. महामार्ग, औरंगाबादरोडवरील काही हॉटेलमध्ये छुप्या, तर काही ठिकाणी खुलेआम मद्यविक्री होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वर्षभरात एकही कारवाई झालेली नाही, तर पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचे बोलले जात आहे. रात्री तर्र होऊन उशिरा दुचाकीवरून घरी जाताना अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. महामार्गावरील काही हॉटेल डाव्या बाजूला आहेत. रस्त्यावरील दुभाजकामुळे विरुद्ध दिशेने वाहने चालवली जाऊन अपघातांची संख्या वाढली आहे. पोलिसांनी या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नागरिकांच्या जिवाशी खेळ होतो मद्यविक्रीने
^महामार्गावरअसलेल्या बहुतांश हॉटेल व्यावसायिकांकडून दररोजच रात्री उशिरापर्यंत मद्यविक्री केली जाते. हा प्रकार म्हणजे परिसरातील नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे. या हॉटेल परिसरात सर्वाधिक अपघाताच्या घटना घडतात.
योगेश नाटकर, संघटक, युवक मराठा महासंघ

कारवाई नसल्याने सर्रास होते मद्यविक्री
अवैधमद्यविक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई होत नाही. पोलिसांनी नियमाप्रमाणे हॉटेल बंद केले तर अपघातांचे आणि गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल.
तुषार जगताप, शहराध्यक्ष, युवक मराठा महासंघ

या रस्त्यांवर होते अवैध मद्यविक्री....
मुंबई-आग्रामहामार्गावरील आडगाव परिसर, औरंगाबादरोड परिसर, दिंडोरीरोड, पेठरोड, मखमलाबादरोड अादी रस्त्यांवर असलेल्या बहुतांश हॉटेल तसेच ढाब्यांमध्ये मद्यविक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत.