आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमणांचा "व्याप', लेखानगर झाले वाळूच्या ट्रकचे अागार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लेखानगर परिसरात एका बड्या वाळू व्यावसायिकाने अापल्या ट्रक लावण्यासाठी चक्क उड्डाणपुलाखालील जागा निवडली अाहे. या ट्रक बाहेर काढताना अाणि पार्क करताना परिसरात वाहतुकीचा प्रचंड खाेळंबा हाेताे.

पाथर्डी फाट्याकडून शिवाजी चाैकाकडून येणारा, असे दाेन रस्ते सर्व्हिसराेडला जाेडले जातात. त्यातच इंदिरानगरचा बाेगदा बंद केल्यामुळे या अतिरिक्त वाहतुकीचा ताण लेखानगरवरच येत अाहे. याच परिसराच्या विरुध्द दिशेलाही ट्रकच्या पार्किंगचा असाच अडथळा हाेत अाहे. ट्रकसोबतच डंपर पोकलॅनसारखी वाहनेदेखील उड्डाणपुलाखाली पार्क केली जातात. मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलाखालील जागेचा वापरही अनेक महिन्यांपासून बिनदिक्कतपणे वाळूच्या ट्रक उभ्या करण्यासाठी केला जातो.