आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व्हिसरोडलाही विळखा अनधिकृत थांब्यांचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात होणाऱ्या गर्दीच्या दृष्टीने वाहतुकीचे नियोजन प्रशासनाकडून तसेच वाहतूक पोलिसांकडून केले जात आहे. त्यासाठीच मोठा गाजावाजा करत अतिक्रमण मोहीमही राबविण्यात आली. रेड मार्किंगचा धाक दाखवत रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची आशाही लावण्यात आली. एकीकडे अशी परिस्थिती असताना नेहमी वाहतुकीची वर्दळ असलेल्या सर्व्हिसरोडवर मात्र सर्रासपणे अवजड वाहने उभी केली जात असल्याचे ‘डी.बी. स्टार’ चमूच्या निदर्शनास आले आहे.
पार्किंगचे पैसे वाचविण्यासाठी सर्व्हिसरोडवरच बिनधास्त वाहने उभी केली जात असल्याने सर्व्हिसरोडला जणू पार्किंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या बाबीकडे वाहतूक पोलिसांबरोबरच प्रशासनाकडूनही सोयीस्कररीत्या दुर्लक्षच केले जात आहे.

शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त करून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, वाहतूक कोंडीच्या त्रासातून वाहनधारकांची अद्यापही सुटका झालेली नाहीच. महामार्गावरील द्वारका, मुंबईनाका, आडगाव नाका चौफुली या परिसरात तर दररोज वाहनांच्या लांबच लांबा रांगा लागत असल्याने अनेकदा छोटे-मोठे अपघातही वाढत आहेत. या वाहतूक कोंडीत सर्व्हिसरोडवर उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे अधिकच भर पडत असते. तपोवन चौफुली ते थेट मुंबई नाक्यापर्यंत सर्व्हिसरोडच्या दुतर्फा वाहतूक पोलिसांच्या कारवाईची भीती बागळता वाहने उभी केली जातात. याठिकाणी गॅरेजदेखील असल्याने रस्त्यावरच वाहने दुरुस्तीचा थाट मांडला जाताे. या प्रकारामुळे वाहतुकीला अडचण ठरत असतानाही अशा वाहनांवर कारवाईच केली जात नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शोरूममध्ये येणारी वाहने रस्त्यावरच
मुंबईनाकापरिसरात दुचाकी वाहनांचे शोरूम आहे. या शोरूममध्ये येणाऱ्या नागरिकांना थेट रस्त्यावर वाहने लावण्याच्या सूचना दिल्या जातात. परिणामी, पादचारी तसेच नागरिकांना मार्गक्रमण करताना जीव धाेक्यात घालून तारेवरची कसरत करावी लागते. या मार्गावरच अनेक नादुरुस्त वाहनेही उभी असल्याने या परिसराला भंगार बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
थ्री व्हीलर टेम्पोचालकांचाही सर्व्हिसरोडवर अनधिकृत थांबा
महामार्गालगतच्यासर्व्हिसरोडवर अनेक ठिकाणी रिक्षाचालक, टॅक्सीचालक यांसह थ्री व्हीलर टेम्पोचालक यांनी अनधिकृत थांबे तयार केले आहेत. ज्यामुळे वाहतूक कोंडीच्या या समस्येत अधिक भर पडत आहे. वाहतुकीला पर्याय म्हणून तयार करण्यात आलेल्या या सर्व्हिसरोडवरच असलेल्या या थांब्यांमुळे अपघातांतही वाढ होत आहे.
अधिकाऱ्यांना कारवाईसंदर्भात लवकरच सूचना देणार
- महामार्गालगत सर्व्हिसरोडवर मोठ्या संख्येने अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई का होत नाही?
शहरातीलसर्व्हिसरोड हे पार्किंगचे ठिकाण नाही. त्यामुळे या सर्व्हिसरोडवर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी महामार्ग पोलिस प्रशासनातर्फे सातत्याने मोहीम राबविण्यात येत असते.

- अशा वाहनांविरोधात नेमकी कशा प्रकारची कारवाई विभागाकडून केली जाते?
सर्व्हिसरोडवरउभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांविरोधात दंडात्मक तसेच, जप्तीची कारवाई केली जाते. वाहतुकीला कुठल्याही प्रकारची अडचण ठरत असल्याचे निदर्शनास आले, किंवा तशा तक्रारी आल्यास तातडीने अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते.
- परंतु, तरीदेखील अद्यापही सर्व्हिसरोडवर मोठ्या संख्येने वाहने उभी असल्याचे दिसते?
सर्व्हिस रोडवर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात तत्काळ अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना देण्यात येतील.
- गॅरेज चालकांमुळे तसेच बेशिस्त वाहनचालकांमुळे ही समस्या अधिक गंभीर होत आहे, त्याचे काय?
सर्व्हिसरोडवरउभ्या करण्यात येणारी गॅरेज चालकांची बंद अवस्थेतील वाहने तसेच पैशांच्या बचतीसाठी वाहने काेठेही पार्किंग करणाऱ्यांचे प्रबोधन केले जाईल. त्यांना वाहतुकीच्या समस्येची जाणीव करून दिली जाईल, जेणेकरून ही समस्या सुटेल.
पुढील स्लाइडसवर क्लिक करून वाचा, ..तर सुटू शकते वाहतूक कोंडी... हाणामारी अन‌् गैरप्रकारही घडतात...
बातम्या आणखी आहेत...