आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाहतूक, ५१ वाहनचालकांवर कारवाई; अारटीअाेचा व्हॉट्सअॅप नंबर जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विद्यार्थ्यांचीवाहतूक करणाऱ्या व्हॅनला आग लागल्यानंतर तसेच रस्त्यांवर वाढणारे अपघात रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून सोमवार(दि.५)पासून अभियान सुरू करण्यात आले. या अभियानात शालेय वाहतूक करणारी वाहने, रिक्षा, स्क्रॅप रिक्षांमधून प्रवासी वाहतूक, बेकायदेशीर वाहतूक आणि गॅस किट बसवलेल्या वाहनांची तपासणी करण्यात आली असून, ५१ अवैद्य वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, शहरात कुठेही वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवून ओम्नीचालक, रिक्षाचालक शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी ८३२९४०२००२ या व्हॉट्स अॅपवर नंबर देण्यात आला आहे.

शालेय वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत कायदा धाब्यावर बसवून शहरात विनापरवाना अवैध शालेय वाहतुकीचा धंदा सर्रास सुरू आहे. तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांकडून एकाही नियम व्यवस्थित पाडला जात नसल्याचे चित्र आहे. शहरात सुरु असलेली या अवैध वाहतुकीच्या विरोधात आता प्रादेशिक परिवाहन कार्यालयाकडून मोहीम सुरु करण्यात आली असून सोमवारी(दि.५)शहरातील भागात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली.या मोहीम शालेय वाहतुकीसाठी जुन्या मारुती व्हॅन कालबाह्य रिक्षांचा वापर करणाऱ्यांवर, खासगी वाहनतून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यंवर यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन, हेल्मेट, सीट बेल्टचा वापर करणे, अतिवेगाने धोकेदायक पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई जनजागृती करण्यात अाली.
प्रादेशिक परिवाहन विभागाची या मोहीम ४० दिवस चालणार असून या मोहीमेसाठी २० वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांकडून शहरातील सर्व शाळेत भेट दिली जाणार असून शालेय परिवहन समिती गठीत करण्याचे सूचना करण्यात येणार आहे.
कडक मोहीम राबविणार
अवैद्यवाहतुकीवरनियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात असून, सोमवारी ५१ वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. मोहीम ४० दिवस चालणार आहे. तक्रार करण्यासाठी ८३२९४०२००२ हा व्हॉट्सअॅप नंबरही दिला अाहे -भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
या वाहनांवर झाली कारवाई
वाहन ताब्यात घेतले १७
स्कूल व्हॅनवर कारवाई ०९
रिक्षांवर कारवाई ३३
कालबाह्य वाहनांवर कारवाई ०२
रिक्षामध्ये फ्रन्ट सिट बसविलेल्यांवर ०७
वाहनांवर झाली कारवाई ५१
बातम्या आणखी आहेत...