आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Illegal Water Taking At Uabardari Dam Sinner, Nashik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उंबरदरी धरणातून अवैधरीत्या पाणी उपसा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर: लघुपाटबंधारे विभागाचा कर्मचारी आणि शेतकर्‍यांच्या संगनमताने तालुक्यातील उंबरदरी धरणातून सर्रास पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे ठाणगावसह पाच गावांना पाणीपुरवठा करणारी योजना अडचणीत सापडली आहे. पाणीपुरवठा समितीने वारंवार तंबी देऊनही संबंधित कर्मचारी पाणी उपसा करणार्‍या शेतकर्‍यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत असून, अवैध उपसा होत नसल्याचे ठामपणे सांगत असल्याने परिसरातील शेतकर्‍यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उंबरदरी धरणात सद्यस्थितीत अल्प साठा शिल्लक आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने ठाणगाव, पाडळी, हिवरे, पिंपळे, टेंभुरवाडी आणि त्यांच्या वाड्यांना पाणीपुरवठा कसा करावा या विवंचनेत पाणीपुरवठा समितीचे पदाधिकारी आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत आहे त्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पाणीपुरवठा समितीच्या पदाधिकार्‍यांनी लघुपाटबंधारे विभागाचे कर्मचारी घाणे यांना दिल्या आहेत. मात्र, कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
धरणातून रात्री मोठय़ा प्रमाणावर पाणी उपसा होत आहे. ठाणगावचे सरपंच नामदेव शिंदे यांनी रविवारी धरण परिसरात फेरफटका मारला असता धरणावर दिवसा एक विद्युतपंप आढळून आला. यासंदर्भात कर्मचार्‍यास विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवले. गावातील नागरिकांसमक्ष शिंदे यांनी कर्मचार्‍यास तंबी दिली. मात्र, त्याने असा कुठलाही प्रकार होत नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली.