आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेकायदा काम करणार्‍यांवर गुन्हे नोंदवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आरक्षण असलेल्या जागेवर बेकायदेशीर इमारत बांधल्यानंतर आरक्षण बदलाचा प्रस्ताव सादर करणार्‍या मविप्र संस्थेच्या संचालक मंडळासह अशा स्वरूपाचा प्रस्ताव स्वीकारणार्‍या महापालिकेच्या नगररचना आणि अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केली आहे.
मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेने महापालिकेकडून कोणत्याही स्वरूपाची परवानगी न घेताच सन 2002 मध्ये शाळेची इमारत उभारली आहे. या पार्श्वभूमीवर बडगुजर यांनी नगररचना विभागाकडून माहिती घेत बेकायदा काम करणार्‍या प्रशासनाला दोषी धरले आहे. अग्निशमन विभागाचे आरक्षण असताना त्यावर इमारतीचे बांधकाम करणे हे गैर असून, त्यानंतर संस्थेकडून नगररचना अधिनियमानुसार 37 (1) बाबत प्रस्ताव करणे ही आणखी दुसरी चूक आहे. अग्निशमन केंद्रासाठी 15 मीटर आणि 18 मीटर रस्त्याची गरज असते. त्यानुसार संबंधित जागेवर आरक्षण असताना तेथील आरक्षण बदलाबाबत सर्मथन देणार्‍या अग्निशमन अधिकार्‍यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
वास्तविक आरक्षणाविषयी डॉकेटमध्ये बदल करण्यात येत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून द्यायला हवी होती. मात्र, तसे न करता नगररचना विभागाने सभागृहाचीच दिशाभूल केल्याचे स्पष्ट होत असल्याने संबंधित अधिकार्‍यांवरही आयुक्त संजय खंदारे यांनी कारवाई करावी, अशी मागणी करीत आरक्षणात कोणताही बदल न करता ते ताब्यात घेऊन महापालिकेने प्रस्तावित विकास करावा, अशी सूचना बडगुजर यांनी केली आहे.
इतरही इमारती बेकायदाच
होरायझनप्रमाणेच संस्थेचे पॉलिटेक्निक, अँग्रिकल्चर आणि मॅनेजमेंट कॉलेजच्या इमारतीही बेकायदा असून, यापैकी एकाही इमारतीला संस्थेने परवानगी घेतलेली नाही. महापालिकेचा पूर्णत्वाचा दाखलाही मिळालेला नसताना यासंदर्भात येत्या 9 ऑगस्ट रोजी होणार्‍या महासभेत प्रशासनाला जाब विचारणार आहे. परवानगी न घेताच कामे करणार्‍या संस्थेच्या संचालक मंडळावर डिस्कॉलीफिकेशन अँक्टनुसार कारवाई करावी, अशी मागणीही बडगुजर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केली आहे.