आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ. वर्षा लहाडे निलंबित, सनद हाेणार रद्द, फाैजदारी कारवाईही; बेकायदेशीर गर्भपातावर विधिमंडळ अधिवेशनात शिक्कामाेर्तब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्हा शासकीय रुग्णालयात २२ मार्च राेजी बेकायदेशीररीत्या झालेला गर्भपात अर्थात स्त्रीभ्रूण हत्येची गंभीर दखल घेत राज्याचे अाराेग्यमंत्री दीपक सावंत यांनी या प्रकरणात तथ्य असल्याचे विधिमंडळ अधिवेशनात सरकारद्वारे निवेदन करताना शुक्रवारी सांगितले.
 
‘दिव्य मराठी’ने या प्रकरणाला वाचा फाेडल्यानंतर समाजाच्यादृष्टीने घातक यंत्रणेच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या या प्रकरणात जिल्हा रुग्णालयातील स्त्रीराेगतज्ज्ञ डाॅ. वर्षा लहाडे यांना निलंबित करणे, त्यांची वैद्यकीय सनद रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणे त्यांच्याविराेधात फाैजदारी गुन्हे दाखल करण्याचे अादेश देत यापुढे अशी हिंमत काेणी करणार नाही अशा पद्धतीचा कारवाईचा संदेशही दिला. ‘दिव्य मराठी’ने गेल्या रविवारपासून सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करीत यासंदर्भातील प्रत्येक बातमी दिली.
 
२२ मार्च राेजी जिल्हा शासकीय रुग्णालयात निफाडमधील उंबरखेड या गावातील ३१ वर्षीय मातेचा संशयास्पद गर्भपात झाला हाेता. या प्रकरणाची कुणकुण लागल्यावर महापालिका वैद्यकीय पथकाने छापा टाकला. मात्र, गर्भपात हाेऊन जेमतेम दाेन तास हाेत नाही ताेच गंभीर अवस्थेतील माता गायब झाल्यामुळे संशय वाढला. त्यात गर्भपाताच्या कागदपत्रात फेरफार करणे, अर्भकाची परस्पर विल्हेवाट लावण्याचे प्रकार, शवविच्छेदनाला दिलेली बगल यामुळे प्रकरण गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशाप्रकारची १९० गर्भपाताची प्रकरणे असून, त्यात अांतररुग्ण उपचारपत्र नसल्यामुळे सखाेल चाैकशीची शिफारस महापालिका वैद्यकीय पथकाने केली.

हा अहवाल ‘दिव्य मराठी’च्या हाती लागल्यानंतर पर्दाफाश झाला. त्याची गंभीर दखल घेत अाराेग्यमंत्री सावंत यांनी प्रथम अाराेग्य उपसंचालक तर त्यानंतर अाराेग्य सहसंचालक या दाेघांमार्फत सखाेल चाैकशी केली. गर्भवती मातेपासून तर या प्रकरणाशी संबंधित डाॅ. लहाडे, जिल्हा शल्यचिकित्सक ते परिचारिका या सर्वांचे जबाब घेतले. त्यानंतर अाराेग्य संचालकांमार्फत राज्याच्या अाराेग्य विभागाच्या अपर सचिवांकडे अहवाल गेला. त्यानंतर शुक्रवारी भाजप अामदार देवयानी फरांदे यांच्याकडून पाठपुरावा सुरू असल्यामुळे अखेर विधानसभेत अाराेग्यमंत्र्यांनी यासंदर्भात निवेदन केले.
 
काेणाला साेडणार नाही
अशा प्रकरणात अाराेग्याधिकाऱ्यांनाच कारवाईचे अधिकार अाहे. मात्र, अशा संवेदनशील प्रकरणात अधिकार काेणाला, यावरून वाद करता कारवाई महत्त्वाची अाहे. काेणालाही साेडणार नाही. कारवाई हाेईलच.
- अभिषेक कृष्णा, अायुक्त, मनपा
 
साेमवारी गुन्हा दाखल हाेण्याची शक्यता
महापालिकाअायुक्त अभिषेक कृष्णा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अाराेग्याधिकारी डाॅ. विजय डेकाटे यांना तत्काळ प्रसूतीपूर्व गर्भलिंगनिदान अन्य अाक्षेपानुषंगाने गुन्हे दाखल करण्याचे अादेश दिले अाहेत. त्यानुसार अाराेग्याधिकाऱ्यांनी सायंकाळी महापालिका वैद्यकीय पथकातील डाॅक्टरांची बैठकही घेतली. या बैठकीत गुन्हे दाखल करण्याचे ठरले असून, वकिलांचा अभिप्राय त्यांच्याकडून याेग्य तक्रार तयार करून त्याअनुषंगाने गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया साेमवारी हाेण्याची शक्यता अाहे.
 
काय म्हटले अाराेग्यमंत्री
२०अाठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा अवैधरीत्या गर्भपात करून डाॅ. लहाडे यांनी गर्भपातविराेधी कायदा (एमटीपी) १९७१ अधिनियम २००३ चे उल्लंघन केले अाहे. खासगी वैद्यकीय व्यवसाय केल्याचे तसेच यापूर्वी मुंबई शुश्रूषागृह नाेंदणी कायद्यानुसार खासगी रुग्णालयासाठी दिलेल्या प्रमाणपत्रात नियमबाह्यरीत्या फेरफार केला. एवढेच नव्हे तर गर्भपातविराेधी कायदा पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे अाढळले. या प्रकरणाच्या चाैकशीत डाॅ. लहाडे दाेषी असल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात अाले.
 
तसेच, गर्भपातविराेधी कायद्याचे उल्लंघन करणे, प्रमाणपत्रात फेरफार केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला. लहाडे यांची नियमबाह्य गंभीर वर्तणूक लक्षात घेता त्यांची वैद्यकीय नाेंदणी रद्द करण्याची शिफारस महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे केली जाणार अाहे. दरम्यान, प्रसूतीपूर्व लिंगनिदान प्रतिबंधक कायदा १९९४ च्या पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे समुचित प्राधिकरणाकडे कारवाईसाठी शिफारस केली जाणार अाहे.
 
बातम्या आणखी आहेत...