आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय विद्यार्थ्यांची ‘कोंडी’ सुरूच...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शालेय वाहतूक करणाऱ्या रिक्षा, व्हॅन, बसमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट मुले दाटीवाटीने बसलेली... खांद्यावर दप्तराचे ओझे... अशा गुदमरलेल्या वातावरणात अनेक विद्यार्थी बुधवारी (दि. ७) शाळेत पोहाेचले. प्रादेशिक परिवहन विभागाकडून मोहीम सुरू असली तरी अवैध विद्यार्थी वाहतूक जोमात सुरू असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत दिसून आले.

गेल्या तीन दिवसांत शंभरपेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवून बहुतांश ओम्नीचालक, रिक्षाचालक शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करत अाहेत.

शालेय प्रवासी वाहतूक करण्याचा परवानाच अनेकांकडे नसल्याचेही समोर आले आहे. तर अनेक परवानाधारकांनी परवाने नूतनीकरणही केलेले नसल्याचेही समोर आले. तसेच, गेल्या दोन महिन्यांपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयात शालेय विद्यार्थी वाहतुकीसाठी अर्ज केलेल्या वाहनचालकांना अद्याप परवाना मिळालेला नसल्याच्याही तक्रारी काही वाहनचालकांनी केल्या.
नियमावली कागदावरच : शालेय वाहतूक नियमावलीचे उल्लंघन करून रिक्षा-व्हॅनचालक योग्य प्रकारे विद्यार्थ्यांची ने-आण करत नसल्याचे समोर आले आहे. आरटीओने शाळांना शालेय परिवहन समितीची स्थापना करण्याची सूचना केली आहे. या समितीकडे शालेय वाहतूक नियमावली स्कूल बस आणि व्हॅनचालकांना समजावून सांगण्याची जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात नियमावली कागदोपत्रीच असल्याचे चित्र आहे.

मोहीम सुरूच..
अवैधवाहतुकीविरोधातमोहीम सुरूच राहील. अाधी वाहनचालकांचे प्रबोधन केले जात आहे. काही ठिकाणी कारवाईही हाेत आहे. पुढील टप्प्यात अवैध वाहतुकीविराेधात कडक पावले उचलली जातील. -भरत कळसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

अवैध वाहतुकीवर कारवाईच नाही ...
या मोहिमेत परवानाधारक आणि नियमित वाहतुकीचीच तपासणी केली जात असल्याचे समोर आले आहे. तर ‘दिव्य मराठी’च्या पाहणीदरम्यान क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहनात बसविणाऱ्या वाहनांवर अद्याप एकाही ठिकाणी कारवाई झालेली नसल्याची तक्रार काही रिक्षाचालकांनी केली.

३५ परवाने प्रलंबित
शालेयविद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ३५ हून अधिक वाहनचालकांनी अारटीअाेच्या कार्यालयात परवान्यासाठी अर्ज केला आहे. काही वाहनचालकांनी दीड महिन्यापूर्वी, तर काहींनी दोन महिन्यांपूर्वीच अर्ज दिला आहे. मात्र, या वाहनचालकांना परवानेच दिले जात नसून ते प्रलंबित असल्याची माहिती एका विद्यार्थी वाहतूकदाराने दिली.

पैसे पूर्ण घेता, मग...
विद्यार्थीवाहनांकडेअारटीअाेसह शाळांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. वाहनचालक पैसे पूर्ण घेतात, मग नियम का पाळत नाही? -संजय महाले, पालक
परवानेच मिळेना...

दोन महिन्यांपूर्वी शालेय विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात अर्ज केला होता. अजून परवाना मिळालेला नाही. -विद्यार्थी वाहतूक वाहनचालक

अशी झाली कारवाई
{५१ वाहनांवर सोमवारी कारवाई
{ ४३ वाहनांवर मंगळवारी कारवाई
{ ५० वाहनांवर बुधवारी कारवाई
बातम्या आणखी आहेत...