आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा माहात्म्य: नाशिकचे नेतृत्व करतो ‘सिंहस्थ कुंभमेळा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेणत्याही महानगराचा चहूबाजूने आणि सर्व अंगांनी विकास व्हायचा असेल, तर त्या महानगराला एखाद्या माेठ्या राजकीय नेतृत्वाची गरज असते. त्या नेत्याचे किमान दाेन-तीन दशके राज्य आणि केंद्रात वजन असेल, तर आपाेआपच ते महानगर विकसित हाेत जाते. मात्र, नाशिकला दुर्दैवाने भाऊसाहेब हिरे यांच्यानंतर अशा नेत्यांची वानवाच राहिली. त्यामुळे नाशिकचा जाे काही विकास झाला ताे या नगरीच्या अंगभूत गुणांमुळे आणि नाशकात दर बारा वर्षांनी हाेणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे. त्यामुळे नाशिकच्या वाढीत सर्वकालीन महान याेगदान जर कुणाचे माेजायचेच झाले, तर ते या कुंभपर्वाचे असून, ताे कुंभमेळाच आपल्या या नगरीचा सर्वमान्य नेता आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
काेणताही नेता एखाद्या महानगराचा विकास घडवायचा असेल, तर काय करताे? महानगराच्या जडणघडणीत माेलाची भूमिका बजावताे म्हणजे काय करताे? तर त्या नगराच्या मूलभूत विकासासाठी शासनाकडून अधिकाधिक निधी मिळवून देताे, त्या भागातील भाैगाेलिक रचनेनुसार तिथे साधनसंपत्तीचा विकास करताे, ितथे नवनवीन माेठे उद्याेग आणून स्थानिकांच्या हाताला राेजगार मिळवून देताे, महानगरातील दळणवळण सुविधांना प्राधान्यक्रम देऊन त्या शहराची अन्य शहरांशी असलेली कनेक्टिव्हिटी वाढवताे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळीला बळ देताे आणि त्या महानगराची एक स्वतंत्र चांगली आेळख निर्माण करण्यात आपले याेगदान देताे. नाशिकच्या बाबतीत हे सर्व काेण करतं? असा जर विचार केला, तर बहुतांश प्रमाणात हे काम नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी येणा-या सिंहस्थ कुंभमेळ्याने केले आहे, याबाबत कुणीच दुमत दाखवू शकणार नाही.

गाेदास्वच्छतेबाबत प्रवृत्त करताे कुंभमेळा : प्रत्येकनदीला जीवनवाहिनी मानले जाते. त्र्यंबकला उगम पावून नाशिकमधून वाहणा-या गाेदावरील दक्षिणेची गंगा असेच संबाेधले जाते. त्यामुळे ज्याप्रमाणे आता गंगा स्वच्छता ही केवळ धार्मिक गरज नसून, तिच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अवलंबून असणा-या सुमारे ४० काेटी नागरिकांच्या जीवनाशी निगडित समस्या मानून गंगासफाईला राष्ट्रीय धाेरणात स्थान मिळाले आहे. त्याप्रमाणेच दक्षिणेच्या या गंगेला (नाव गाेदावरी असले तरी अस्सल नाशिककर तिला गंगाच म्हणताे) स्वच्छ राखण्याची गरज या कुंभमेळ्यामुळेच दरवेळी अधाेरेखित हाेत असते. त्यामुळेच गाेदास्वच्छता ही आपली जबाबदारी असल्याचे भान स्थानिक प्रशासनासह समाजमनाला देखील हाेेते, ती केवळ कुंभमेळ्यावेळीच. दर बारा वर्षांनी हाेणारी ही जाणीव जर प्रत्येक वर्षी, प्रत्येक महिन्यात, दरराेज हाेत गेली, तर गाेदावरी बारमाही स्वच्छ पाण्याने खळाळू शकते, याची जाणीव देखील केवळ कुंभमेळ्यामुळेच आपल्याला हाेते, हेदेखील नसे थाेडके.

दरबारा वर्षांनी हाेते ‘सिंहावलाेकन’ : काेणत्याहीसमाजात साधारणपणे कालगणना ही दशक पद्धतीने हाेत असते. मात्र, नाशिक हे राज्यातले एकमेव असे महानगर आहे की इथले नागरिक कालगणना देखील बाराच्या पटीत करतात.

जसे मागच्या कुंभमेळ्यात मी जुन्या नाशकात रहायला हाेताे... मागच्या कुंभमेळ्यावेळीच नाेकरी साेडून धंदा सुरू केला...मागचा कुंभमेळा पाहूनच आमच्या वडिलांचे निधन झाले ... १९९१च्या कुंभमेळ्याच्या आधीच आम्ही नवीन घर बांधले ... त्यामुळे अस्सल नाशिककर आणि काही काळ नाशकात राहून झालेला नाशिककर हे दाेघेही त्यांचे सिंहावलाेकन कुंभमेळ्याच्या कालगणनेनुसारच करीत जातात, हे नाशिकचे वैशिष्ट्य वर्षानुवर्षे कायम आहे. भविष्यातदेखील त्यात बदल हाेण्याची शक्यता कमीच दिसते.

कुंभामुळे निधीपासून ब्रॅडिंगपर्यंत सारे काही
काेणत्याहीस्थानिक नेत्याच्या बळाविना नाशिकला दर बारा वर्षांनी काेट्यवधींचा निधी मिळवून देण्याचे काम कुंभमेळ्यामुळे बिनबाेभाटपणे पार पडते. महानगरासह परिघातील रस्ते, पूल यासारख्या कुंभानंतरही कायम राहणा-या पायाभूत साेयीसुविधांचा विकास सिंहस्थामुळे हाेताे. कुंभमेळ्यामुळे नाशिकची धार्मिक शहर ही आेळख अधिक दृढ करण्याचे काम सिंहस्थामुळे आपाेआपच कायम हाेत गेले. कुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक हातांना काम मिळते. महापालिकेच्या विविध विकासकामांचा भार प्रत्येक सिंहस्थ कुंभमेळ्यात माेठ्या प्रमाणात परस्पर पेलला जात असल्याने मनपाच्या आर्थिक स्थितीला आपाेआपच बळ मिळते. ही सारी कामे जर कुंभमेळ्यामुळे अव्याहतपणे घडत असतील तर ताे कुंभमेळा हेच नाशिकचे एकमुखी सर्वमान्य नेतृत्व आहे, असे जर कुणी समजत असेल तर त्यात काहीच अयाेग्य नाही.