आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा माहात्म्य: राजसत्तेवर धर्मसत्तेचा वचक राखण्यासाठी साधू शस्त्रसज्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीर, मन वाणीवर ज्यांची सत्ता चालते ते संन्यस्त. आचार्य, महंत, महामंडलेश्वर, मंडलेश्वर हे संन्यस्त धर्मसैनिक आहेत, अशीदेखील एक संकल्पना रूढ अाहे, तर राजकीय सत्ता ही बहुतांश काळात संपत्ती भोग यांनी पोखरलेली असते. त्यामुळेच या राजकीय सत्तेवर धर्मसत्तेचा वचक राखण्यासाठी या सर्व साधू, संत-महंतांना शस्त्रसज्ज करीत आद्यशंकराचार्यांनी धर्मरक्षणासाठी चार मठ स्थापन केले. दसनामी साधू, संन्यासी, संत महंत यांना मठानुशासनाखाली एकत्र आणून त्यांना त्या-त्या आखाड्यांची सत्ता प्रभुत्व सोपविले. तसेच साधू सन्यासी महंत यांच्या हाती धर्मदंड देऊन त्या धर्मदंडाला राजदंडापेक्षाही उच्च मानण्याचा दंडक घालून दिला.
सर्व संगपरित्याग करून संपूर्ण समाजापासून स्वत:ला अलग ठेवणारा साधू समाज हा शतकानुशतके अस्र, शस्त्र राखण्यासह ते चालविण्याच्या ज्ञानाचादेखील प्रसार करण्याची परंपरा जाेपासत अाला अाहे. या परंपरांमध्ये अनेकांना विसंगती वाटते. मात्र, पूर्वीच्या काळापासून राजसत्तेपेक्षाही धर्मसत्तेला माेठेपणा देण्यात अाला अाहे. पथभ्रष्ट हाेणाऱ्या राजसत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी म्हणून शेकडाे वर्षांपासून साधू समाज हा शस्त्रसज्ज असल्याचे दाखले पुराणांमध्ये अाहेत. त्यामुळेच अाजच्या युगातही शाहीस्नानाच्या मिरवणुकांमध्ये साधू समाज त्यांच्या अस्र-शस्त्रांचे प्रदर्शन करीत अापल्या परंपरांचे पालन करीत असतात.
पुढे वाचा... शाहीस्नान मिरवणुकीत शस्त्रास्त्रांचे दर्शन