आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभ पर्व: शैवपंथीय साधूंमध्ये भस्माचे विशेष माहात्म्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैष्णव अाणि शैवपंथीयांमधील अन्य फरकांप्रमाणेच गंध अाणि भस्मातही भिन्नता असते. शैवपंथीय अाखाड्यांच्या साधूंमध्ये गंधाइतकेच महत्त्व भस्मलेपनाला असते. शैवपंथीय साधू सामान्यपणे तिहेरी अाडवे गंध लावतात. त्या तिहेरी गंधाला सामान्यपणे त्रिपुंड म्हणूनच संबाेधले जाते. हे त्रिपुंड लावून मगच भगवान शिवशंकराची पूजाअर्चना केली जाते. तसेच काही कापालिक, तांत्रिक साधू त्यांच्या त्रिपुंडाबराेबरच लाल कुंकवाचा देखील वापर करतात.

भस्मलेपनामागील परंपरांचा शास्त्राेक्त विचार
कपाळावरगंध लावण्यापूर्वी सर्वांगास भस्मलेपन करण्याच्याही प्रथा अाहेत. त्या मागील विचारदेखील माेठा राेचक अाहे. भस्मामध्ये दुर्गंधीनाशक मनाला उत्तेजक अशी द्रव्ये आणि विविध रासायनिक घटक असतात. भस्मामध्ये शरीरातील कर्बद्रव्ये शोषून घेण्याची शक्ती असते, असे शास्त्र सांगते. तसेच भस्मामुळे शरीरातील सांधे, कपाळ, छाती, पाठ आदी शरीराच्या भागांवर नियमित भस्मलेपन केल्यास संधिवाताचा प्रादुर्भाव होत नाही. शरीर अाणि मुखावरील तेज आणि ओज यांचे रक्षण होत असल्याचेही दाखले शास्त्रात दिले जात असल्याने साधूंच्या अन्य परंपरांप्रमाणे गंध अाणि भस्मलेपनाची परंपरा सुरू आहे.

भस्मलेपनात मृत्युंजय मंत्र
भगवानशिवशंकर देखील संपूर्ण शरीराला भस्म फासत असल्याचे पुराणांमध्ये असल्याने सर्व शैवपंथीय साधूदेखील सर्वांगाला भस्म लावतात. त्यात कपाळावर भस्मलेपन करताना मृत्युंजय मंत्राचा जप करण्याची प्रथादेखील शैव साधू, महंतांमध्ये अाहे. जाे शंकर अापले पालनपाेषण करून जीवन सुगंधित करताे तसेच, जन्म अाणि मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवून देताे, त्या शंकराचे स्मरण त्यातून केले जाते.

अाग्नेय स्नानाला महत्त्व
कुंभमेळ्यातसर्व शैवपंथीय (त्र्यंबकेश्वरला असणाऱ्या दहाही अाखाड्यांचे) साधू सर्वांगाला भस्म लेपून मग स्नानासाठी मिरवणुकीने बाहेर पडतात. सर्वांगाला भस्म लावून केल्या जाणाऱ्या स्नानाला अाग्नेय स्नान असे संबाेधले जाते. केवळ कुंभमेळ्यांमध्येच अशा प्रकारे स्नान करण्याची प्रथा अस्तित्वात असल्याने त्या स्नानापूर्वी सर्वांगाला भस्मलेपनासह त्रिपुंड लेपनाचा विधीदेखील एक तासापेक्षा अधिक काळ चालताे.

नागा साधू सर्वांगाला लावतात भस्म
शैवपंथीयांमधीलसर्वाधिक अाक्रमक, लढवय्ये साधू म्हणून ज्यांची ख्याती अाहे, ते नागा साधू तर सर्वांगाला भस्म लावून जणू भस्माचेच वस्त्र लपेटून घेतात. सर्वांगाला भस्म लावणाऱ्या नागा साधूंचाही पंथ शैवपंथीयातच माेडताे. नागा साधू डाेळ्यांच्या बाजूलाही गंध लावत असल्याने ते नागा असल्याचेही अाेळखता येते. हिमालयात थंडीपासून बचाव करण्यात भस्म महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने त्या काळापासूनच सर्वांगाला भस्म लावण्याची परंपरा रुजल्याची साधूंची श्रद्धा अाहे.