आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल चोरी करणारी टोळी जेरबंद, ४० मोबाइल हस्तगत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहर आणि परिसरात मोबाइल चोरी करणारी पाच सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद करण्यास पंचवटी पोलिसांना यश आले आहे. रविवारी मध्यरात्री पंचवटी परिसरात ही कारवाई करण्यात आली. टोळीकडून चोरी तब्बल ४० मोबाइल असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. संशयितांमध्ये दोन अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश आहे. संशयितांना तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दोन अल्पवयीनांची किशोर सुधारालयात रवानगी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी परिसर, आठवडे बाजार आणि शहर परिसरात मोबाइल चोरीच्या आणि लुटण्याच्या घटना घडत होत्या. पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरात विशेष शोधमोहीम राबवत मोबाइल चोरी करणारे सराईत गुन्हेगार रघुनाथ बोडके, दीपक शेळके, आकाश मोहिते यांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये दोन अल्पवयीन सराईतांची नावे त्यांना सांगितली. चौकशीमध्ये मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. संशयितांच्या घरझडतीमध्ये चोरीचे ४० मोबाइल असा सुमारे लाख ५० हजारांचा ऐवज त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, उपनिरीक्षक महेश इंगोले, शैलेंद्र म्हात्रे, प्रवीण कोकाटे, विजय गवांदे, अाप्पा गवळी, सुरेश नरवडे, प्रभाकर पवार, संदीप शेळके, महेश साळुंके, संतोष काकड, सतीश वसावे, मोतीराम चव्हाण, सचिन म्हसदे, भूषण रायते यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांकडून मोबाइल चोरीसह लुटमारीचे आणखी गुन्हे उघडकीस येणार असल्याचे पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. तीन संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अल्पवयीनांची रवानगी किशोर सुधारालयात करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...