आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडीक्रशरच्या ट्रकमधून पडल्याने मजुराचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- खडीची वाहतूक करणाऱ्या चालत्या ट्रकमधून खाली पडून सारूळ येथे शनिवारी (दि. ९) दुपारी वाजेच्या दरम्यान एका मजुराचा मृत्यू झाला आहे. याबाबत वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील अवैध खडी क्रशिंग आणि त्याच्या होणाऱ्या असुरक्षित वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारूळ येथील खाणीतून ट्रक (एमएच १५ सीआर ५६१६) खडी घेऊन जात होता. त्यामध्ये जगन किसन चहाडे (४२) हा मजूरही बसलेला होता. सारूळ परिसरातच थोड्या अंतरावर ट्रक गेला असता या चालत्या ट्रकमधून चहाडे खाली पडला. त्यात त्याच्या डोक्यास गंभीर मार लागला. लागलीच त्याला काही मजुरांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, येथे उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. जिल्हा रुग्णालयात चहाडे यांच्या नातेवाइकांनी माेठी गर्दी केली होती.

दरम्यान, या प्रकरणात केवळ संबंधित ट्रकचालकाच्या विरोधातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या खडीचे उत्खनन परवानगी घेऊन केले होते का, त्याच्या वाहतुकीचा परवाना होता का, याची मात्र कुठलीही तपासणी झाली की नाही, हे प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत. त्याचबराेबर, या धकाधकीच्या व्यवसायात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न या घटनेनंतर निर्माण झाला अाहेे.