आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयशरच्या धडकेत युवक, भोवळ आल्याने जवान ठार, तीन घटनांमध्ये तीन जण मृत्युमुखी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- गोपाळबाबू पाटील (वय ३२, रा. कन्हाळे बुद्रूक) हा युवक महामार्गावरून शिवपूर-कन्हाळे मार्गाकडे पायी जात होता. त्याच वेळी नाहाटा चौफुलीकडून येणाऱ्या आयशरने (क्रमांक एमएच-४८/जे-८७५) त्याला धडक दिली. या भीषण अपघातात गाेपाळ पाटील याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, शहर वाहतूक शाखेचे साहाय्यक पाेलिस निरीक्षक एम.एन.मुळूक यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी मृतदेह तातडीने पालिका रुग्णालयात रवाना करून आयशरचालकास ताब्यात घेऊन वाहन जप्त केले. याप्रकरणी सुधीर जोहरे (रा.कन्हाळे बुद्रूक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे हवालदार आनंदसिंग पाटील पुढील तपास करीत आहेत.

अनोळखी मृतदेह
शहरातीलरानातील महादेव मंदिर परिसरातील हुडको कॉलनीत गुरुवारी दुपारी अनोळखी ३५ वर्षे वयोगटातील इसमाचा मृतदेह आढळून आला. बाजारपेठचे पाेलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, साहाय्यक निरीक्षक मनाेज पवार यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृताने चौकटींचा शर्ट अंडरपँट परिधान केली आहे. यामुळे मृताची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान, मृतदेह आढळल्याने रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.

पुलावरून उडी
तापी पुलावरून अंदाजे ५०वर्षीय इसमाने नदीपात्रात उडी मारल्याची घटना गुरुवारी सकाळी वाजता घडली. हतनूर धरणातून विसर्ग सुरू असल्याने तापीला पूर आला आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यात संबंधित इसम वाहून गेला. नदीपात्रात उडी मारण्यापूर्वी इसमाने त्याच्याजवळील छत्री पुलाच्या कठड्याला टांगली होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या घटनेची शहर पोलिसांत उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

परेडदरम्यान घटना
आरपीडी मैदानावर पहाटे ५.३० वाजता लष्करी जवानांची परेड सुरू होती. परेडदरम्यान आर्मी नाईक विनोदकुमार (वय ३२) यांना भोवळ आल्याने ते खाली कोसळले. त्यांना लष्करी रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले. लेफ्टनंट कर्नल वरुणेंद्र बसिंग यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मोबाइल लांबवले
रजाटॉवर चौकातील अरमान मोबाइल शॉपीतून चोरट्यांनी ६९ हजार ७०७ रुपयांचे मोबाइल लांबवल्याची घटना गुरुवारी सकाळी उघड झाली. शटरच्या वर असलेली काँक्रीटची जाळी तोडून चोरट्याने दुकानात प्रवेश केला. दुकानमालक शेख तन्वीर नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री ९.३० वाजता दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर चोरी झाली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

महामार्गावरील हॉटेल यशवंतजवळ आयशरने धडक दिल्याने पादचारी युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता घडली. दुसऱ्या घटनेत एका इसमाने तापी पुलावरून नदीत उडी घेतली. तिसरी दुर्दैवी घटना आरपीडी मैदानावर घडली. सकाळच्या नियमित परेडदरम्यान भोवळ आल्याने लष्करी जवानाचा मृत्यू झाला, तर अन्य एका घटनेत राष्ट्रीय महामार्गालगत अनोळखी इसमाचा मृतदेह गुरुवारी दुपारी आढळून आला.
बातम्या आणखी आहेत...