आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Accident Youth On The Spot Death Issue At Nashik

कंटेनरच्या धडकेत युवकाचा मृत्यू, नाशिकरोडला सत्कार पॉइंटजवळ अपघात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - बहिणीला नोकरीच्या ठिकाणी पोहोचवून घरी परतणाऱ्या युवकावर काळाने झडप घातली. देवळाली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सत्कार पॉइंट येथे कंटेनरच्या धडकेत विपुल उमेश गाेरवाडकर (वय १७) याचा शुक्रवारी (दि. १४) सकाळी जागीच मृत्यू झाला.

शताब्दी महाविद्यालयात सिव्हिलच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत असलेला विपुल गाेरवाडकर (रा. आशीर्वाद अपार्टमेंट, सौभाग्यनगर) हा सकाळी कारडा कन्स्ट्रक्शन येथे नोकरीस असलेल्या लहान बहिणीला पोचवून दुचाकीवरून (एमएच १५ डीएन ६६३५) घरी परतताना सत्कार पॉइंट येथून मालधक्क्याकडे जाणाऱ्या कंटेनरने (एमएच १५ सीआर १७९९) धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी कंटेनरसह चालक बळवंत विश्वनाथ यादव (२६, रा. सिन्नर) यास ताब्यात घेतले आहे. देवळाली कॅन्टाेमेंट बाेर्डाचे कार्यालयीन अधीक्षक उमेश गाेरवाडकर यांचा विपुल हा एकुलता एक मुलगा होता.