आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात दुपारनंतर बरसला तीन मिलिमीटर पाऊस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दोन दिवस दडी दिल्यानंतर गुरुवारी पावसाने पुन्हा हजेरी लावली. सकाळपासून ते दुपारपर्यंत उन्हाची तीव्रता वाढल्याने पाऊस गायब होतो की काय, अशी भीती शहरवासीयांमध्ये पसरली होती. मात्र, त्यानंतर अचानक ढग जमून आले. त्यानंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. शहरातील हवामान केंद्रात मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कोकण, विदर्भ, मराठवाडा भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. मात्र, पावसाने यंदा उत्तर महाराष्ट्रावर अवकृपा केली आहे. जुलैच्या सुुरुवातीला पावसाने सुरुवात केल्याने दिलासा मिळाला. मात्र, पुन्हा दोन दिवस पाऊस गायब झाला. गुरुवारी दुपारनंतर पंचवटी, मखमलाबाद, पाथर्डी, जेलरोड, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, सिडको, सातपूर, कॉलेजरोड, गंगापूररोड आदी परिसरात पावसाला सुरुवात झाली होती. साधारण दहा ते पंधरा मिनिटे पाऊस सुरू होता.
बातम्या आणखी आहेत...