आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्य बाजारपेठेतच नो हॉकर्स झोन, प्रस्तावित; झोनविरोधात आक्षेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- केंद्र शासनाच्या आदेशानुसार शहरात फेरीवाला झोन निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून यात प्रामुख्याने शहराची पारंपरिक बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा, बोहोरपट्टी, शालिमारसह तब्बल १०७ ठिकाणी फेरीवाल्यांसाठी बंदी करण्याचे प्रस्तावित केले आहे. प्रस्तावित हॉकर्स झोनविरोधात समिती सदस्यांनी आक्षेप घेतल्यावर आता पोलिस सदस्यांची संयुक्त पाहणीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असा तोडगा निघाला.
शहर फेरीवाला धोरण ठरवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी शहरात १०५ ठिकाणी नो हॉकर्स झोन प्रस्तावित केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काही स्थळांवर सदस्यांनी आक्षेप घेतले. प्रामुख्याने रविवार कारंजा, बोहोरपट्टी, सिव्हिल हॉस्पिटल, बिटको रुग्णालय, कार्बन नाका, आर.टी.ओ कॉर्नरसारख्या ठिकाणी असलेल्या फेरीवाला क्षेत्रावर निर्बंध टाकू नये, अशी मागणी केली. त्यानंतर आर.टी ओ कॉर्नरसारखे काही भाग नवीन रस्त्यालगत असल्यामुळे तेथे फेरीवाला क्षेत्र निर्बंधाचे समर्थनही करण्यात आले. दरम्यान, जुन्या बाजारपेठेशी संबधित विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्यामुळे ही ठिकाणे वगळावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, संयुक्त पाहणी करून ताेडगा काढण्याचा निर्णय झाला आहे. कॉलेजरोडवरील एचपीटी कॉलेजलगतही फेरीवाला क्षेत्राशी शिथिलता द्यावी, अशी मागणी पुढे आली.
हा भाग वगळावा
कॉलेज रोडवरील परिसरात विद्यार्थ्यांचा नियमित राबता असल्यामुळे त्यांना गरजेनुसार विक्रेत्यांकडून वस्तू घ्याव्या लागतात. त्यामुळे हा परिसर या प्रस्तावातून वगळावा, असाही युक्तिवाद झाला.
बातम्या आणखी आहेत...