आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात साकारणार ‘मेक इन इंडिया’, इंजिनिअरिंगच्या १०० प्रकल्पांना पेटंटची प्राप्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘मेकइन इंडिया’ संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी नाशिकच्या इंजिनिअरिंग क्षेत्रातील शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी कल्पकता आणि संशोधनाच्या बळावर अभिनव प्रकल्प तयार केले आहेत. नावीन्यपूर्णता, नवीन शोध आणि उपयुक्तता.. या निकषांवर आधारित या शंभर प्रकल्पांना नवनिर्मितीचे पेटंट प्राप्त झाले आहे. वायरलेस पर्सनल सेफ्टी ब्रेसलेट, इलेक्ट्रॉनिक टिकेटिंग मशिन युजिंग जीएसएम, वॉल पेंटिंग रोबो, ऑटो पेट्रोलपंप ऑपरेटिंग, आरएफआयडी बेस पार्किंग मॅनेजमेंट असे नावीन्यपूर्ण प्रयोग यातून साकारले असून, त्यांनी स्वत:चे उद्योगही सुरू केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील ‘मेक इन इंडिया’ योजनेची यशस्विता इंजिनिअरिंगमधील नवनिर्मितीवरच अवलंबून आहे. चीन, अमेरिका, जर्मनी, जपान या देशांनी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करूनच विकासाचे स्वप्न साकार केले आहेत. त्याच धर्तीवर ‘मेक इन इंडिया’ योजना असल्याने नाशिकमधील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी हे तंत्रज्ञानशोधले आहे. नाशिकमध्ये इंजिनिअरिंगचे २५ कॉलेज आहेत. त्यातील के. के. वाघ, संदीप फाउंडेशन, सपकाळ नॉलेज हब, गुरू गोविंदसिंग, एनडीएमव्ही कॉलेज यांसह इतर कॉलेजांमधील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट तयार केले आहेत.

असेमिळते पेटंट
नावीन्यपूर्णता,नवीन शोध आणि उपयुक्तता यावर तीन निकषांवर आधारित प्रोजेक्टची निवड केली जाते. त्यानंतर या संशोधनाचे सादरीकरण झाल्यानंतर त्या विषयाशी संबंधित किंवा त्याच प्रकारचा शोध यापूर्वी प्रसिद्ध झाला आहे का, हे प्रायर आर्ट ऑफ सर्चद्वारे तपासले जाते. भारत सरकारच्या मिनिस्टर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीअंतर्गत येणाऱ्या कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट, डिझाइन अँड ट्रेड मार्क, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन यांच्या नियम अटींच्या शर्तीनुसार प्रस्ताव तयार केला जातो. त्यानंतर इंडियन पेटंट, गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या ip india.nic.in या संकेतस्थळावर पेटंटसाठी इ-फिलिंग केले जाते. त्यानंतर ऑनलाइन अॅप्लिकेशन क्रमांक मिळाल्यानंतर इंडियन पेटंट ऑफ जनरलमध्ये ते पब्लिश होते. तसेच, या इनोव्हेशनमधील चुकांची दुरुस्ती झाल्यानंतर पेटंट रजिस्टर झाल्याचे प्रमाणपत्र मिळते.

अन् मिळाली दोन लाखांची ऑर्डर
संदीपफाउंडेशनमधील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेतील यज्ञेश जोशी, प्रतीक घरटे, निखिल अलई, चेतन अहिरे या विद्यार्थ्यांनी तयार केलेली पार्किंग मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी दोन लाखांमध्ये फाउंडेशनने बसविली. -यज्ञेश जोशी, संशोधक विद्यार्थी

संशोधक घडतील
नावीन्यपूर्ण संशोधनातून तयार झालेले प्रकल्प भविष्यात प्रत्यक्षात उत्पादनांच्या स्वरूपात साकार झाल्यास संशोधक घडण्यास मदत होईल. तुषार चव्हाण, पेटंट मार्गदर्शक