आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकातील प्रेमीयुगुलाचे जळालेले मृतदेह सापडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक येथील गंगापूररोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असलेली तरुणी शर्वरी फडके आणि तिचा प्रियकर अमन सिंग या दोघांचेही मृतदेह संगमनेरजवळील बोटा येथे जळालेल्या अवस्थेत आढळून आले अाहेत. शर्वरीच्या गळ्यातील साेन्याच्या चेनमुळे या दाेघांची अाेळख पटली असून, हा अाॅनर किलिंगचा प्रकार असल्याच्या संशयावरून पाेलिसांनी तपास सुरू केला अाहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शर्वरी फडके (१६) हिचे अपहरण झाल्याची तक्रार नाेव्हेंबरमध्ये गंगापूरराेड पाेलिस ठाण्यात नाेंदविण्यात अाली हाेती. तिच्या पालकांनी मुलगी बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच बोटा येथे दोन पूर्णत: जळालेले मृतदेह आढळून अाले.तपासाअंतीसंगमनेर पोलिसांना हेे मृतदेह शर्वरी फडके तिचा प्रियकर अमन सिंग (१९) यांचे असल्याचे समजले. या दोघांच्या प्रेमप्रकरणास दाेघांच्याही घरच्यांचा विराेध हाेता. त्यांना पळून जाण्यासाठी मदत करणारे या दाेघांचेही मित्र पंकज सोनवणे, विजय काचे, राहुल गोतिसे या तिघांनीच नंतर चाकूने वार करून त्यांची हत्या केल्याचे नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकल्याचे स्पष्ट हाेत अाहे. दरम्यान, शर्वरी ही तिच्या पालकांची दत्तक कन्या हाेती, अशीही माहिती समाेर येत असून, पाेलिसांनी अाता दाेघांचेही पालक नातेवाइकांची चाैकशी सुरू केली अाहे.