आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Nashik School Bus ,autorikshao Drover Marche To Rto

नाशिकामध्‍ये स्कूल व्हॅनचालकांचा प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विद्यार्थी वाहतूक करणा-या रिक्षा, व्हॅनचालकांनी सोमवारी पुकारलेल्या संपामुळे शहरातील हजारो विद्यार्थ्यांना घराकडे परतण्यासाठी तासन्तास ताटकळावे लागले. पालकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. चालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयावर काढलेल्या मोर्चामुळे वाहतूकही विस्कळीत झाली.
पोलिस व परिवहन विभागाकडून होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ श्रमिक सेनेच्या वतीने विद्यार्थी वाहतूक करणा-या रिक्षा, व्हॅनचालकांचा परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेतून राष्‍ट्रवादी कॉँग्रेस प्रवेश केलेल्या सुनील बागुल यांनी नेतृत्व केले.

स्कूल व्हॅनचालक संपावर असल्याने सोमवारी सकाळपासून पालकांना आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी धावपळ करावी लागली. काहींनी कामाला दांडी मारत पाल्यांना शाळेत सोडले, तर काही विद्यार्थ्यांनी चक्क शाळेलाच दांडी मारली. त्यामुळे आज अनेक शाळांमध्ये सरासरी 50 ते 60 टक्क्यांपर्यंतच उपस्थिती होती. त्यामुळे पालकांनी व शिक्षकांनी या आंदोलनाबाबत संताप व्यक्त केला.

अधिकृत थांबा मिळणार
प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रक्रांत खरटमल यांनी सांगितले की, श्रमिक सेनेच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. शाळेजवळ अधिकृत थांबा देण्याबाबत मनपा- शाळा-पोलिस यांची एकत्रित बैठक घेण्याचे ठरले. विद्यार्थी वाहतुकीसाठी एक हजार परवाने देण्याची मोहीम सुरू करण्यात येणार असून शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करण्यात येईल. कायद्यानुसार परवाना नसलेल्या वाहनांचे निलंबन करणे आवश्यकच असते. इतर मागण्या अवास्तव असून केंद्र शासनाच्या अखत्यारीतील असल्याचे ते म्हणाले.