आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘इन सर्च अॉफ विठ्ठल’ला अांतरराष्ट्रीय सन्मान, अांतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रशियन फेडरेशन, मॉस्को या संस्थेतर्फे ‘युरेशिया अांतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’मध्ये नाशिकच्या ‘इन सर्च अॉफ विठ्ठल’ या मराठमोळ्या लघुपटाला ‘बेस्ट डॉक्युमेंटरी’ या विभागात विजेता घोषित करण्यात अालं अाहे. वेळेनुसार विभागणी करून दिलेल्या विजेत्यांच्या गटात चाळीस मिनिटांतल्या श्रेणीत या लघुपटाला पुरस्कार मिळाला अाहे. तर लाॅस एंजलिसमध्ये हाेणाऱ्या हाॅलीवूड फिल्म काॅम्पिटिशन २०१७ साठीदेखील या लघुपटाची अधिकृत निवड झाली अाहे. 

 

वारी या विषयावर केलेल्या लघुपटात प्राजक्त देशमुख यांनी मुक्त काव्याच्या अाधारे प्रत्येकाचा अापला अात्मशाेध अाणि वारीतल्या दृश्यांची गुंफण करून एक अमोघ असा अनुभव या लघुपटातून दाखवला अाहे. याला तितकीच पुरक सांगितीक साथ अानंद अोक अाणि त्याच्या स्पंदनच्या चमूने दिली अाहे. तर या लघुपटातले शब्द ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांच्या स्वरात अाहे. ‘इन सर्च अॉफ विठ्ठल’ हा वारीवर अाधारीत लघुपट अाषाढी एकादशीच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला होता. सोशल साईट्सवर या व्हिडिअाेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. अनेकांच्या पसंतीस उतरलेला हा व्हिडिअाे अजूनही मोठ्या संख्येने बघितला जातोय. कारा स्टुडिअोची निर्मिती असलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन अाणि छायाचित्रण अभिषेक कुलकर्णी यांनी केलेले अाहे. सहाय्यक छायाचित्रणकार म्हणून रोहित खैरनार अाणि संकेत कुलकर्णी यांनी काम पाहिले. 

 

नाशिकच्या कलाकारांचे यश 
नाशिकच्या कलाक्षेत्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. संगीत क्षेत्रात नवनवीन प्रयोग मी सातत्याने करत असतो त्याचं हे फळ आहे. प्राजक्तचं लेखन, सदानंद जोशींचा आवाज, अभिषेक कुलकर्णी त्यांच्या सहकार्यांचं अप्रतिम छायाचित्रण यामुळे संगीत करतानाचा अनुभव खूप वेगळा होता. गायक, वादक सर्व टीमचाही खूप मोठा वाटा आहे. 
- आनंद ओक 


हा तर नाशिकचा सन्मान 
हे सगळं अविश्वसनीय अाहे. अापली सृजनात्मक काम ही सॅटेलाइटसारखी असतात या मतावर मी अालो अाहे. सॅटेलाईटमध्ये पृथ्वीची गुरुत्व शक्ती भेदण्यापर्यंतच इंधन असतं. एकदा ते भेदल की पुढे ते त्याचं त्याचं फिरत राहतं अाणि उंची गाठत राहतं. अाम्ही या लघुपटासाठी घेतलेली मेहनत तशीच अाहे. यानिमित्ताने नाशिकच्या नावाचा झेंडा सगळीकडे फडफडतोय ही अभिमानाची गोष्ट अाहे. 
- प्राजक्त देशमुख, लेखक, पटकथा 

 

भारावलाे अाहाेत... 
दिग्दर्शक म्हणून प्रत्येक पुरस्कारासोबत जबाबदारी वाढत जातेय. पुढचे काम अाणखी वरच्या उंचीवर नेण्याचे दडपण अाहे. प्राजक्त अाणि मी अनेक विषयांवर चर्चा करत असतो. विठ्ठलाचा शोध अाम्हाला सन्मान मिळवून देतोय हे खूप अानंददायी अाहे. मी अाणि माझ्या कारा फिल्म्सचे सगळे सहकारी या सन्मानाने भारावलाे अाहाेत. 
- अभिषेक कुलकर्णी, दिग्दर्शक, छायांकन 

बातम्या आणखी आहेत...