आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अाधार’च्या नावाखाली भ्रष्टाचाराचा ‘बाजार’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील प्रत्येक नागरिकाला स्वत:चा अाेळख क्रमांक उपलब्ध करून देण्यासाठी अाधारकार्ड एक महत्त्वाचा पर्याय ठरताे. यासाठी केंद्राने ही नि:शुल्क याेजना अंमलात अाणली असली, तरी लाेकांची गरज लक्षात घेता त्यातूनही पैसे कमावण्याचे प्रकार सुरू झाले अाहेत. अाजघडीला घरगुती गॅससाठी अनुदान मिळवण्याकरिता ग्राहकाला वितरकांकडे बँक खाते अाधार लिंकिंग करण्याची मुदत संपत अाली अाहे. त्यामुळे नाेंदणी केल्यास गॅसचे अनुदान मिळणार नसल्यामुळे ग्राहकांना झटपट अाधारकार्डची गरज भासत अाहे. नेमक्या याच संकटाला संधी मानून शहरातील काही सामाजिक संघटना, मित्रमंडळांनी गल्लीबाेळात अाधारकार्ड वितरण केंद्र सुरू केले असून, ग्राहकांकडून खुलेअाम अव्वाच्या सव्वा पैशांची अाकारणीही केली जात अाहे.

पैसे दिले तरच मिळेल कार्ड
‘डी.बी.स्टार’ चमूने म्हसरूळ, फुलेनगर, पंचवटी परिसरातील अाधार केंद्रांना भेटी दिल्या. या ठिकाणी लाेकांची झुंबड उडाली हाेती. ‘आधारकार्ड मोफत असताना पैसे कशासाठी आकारले जात आहेत’, असा प्रश्न या वेळी डी.बी. प्रतिनिधीने विचारला. त्यावर ‘तुम्हाला काेणी सांगितले,जिल्हाधिकारी कार्यालयात पैसे भरावे लागतात’, असे उत्तर देत येथील कर्मचारी पुन्हा कामाला लागले. त्याला पुन्हा हटकवून ‘मी अधिकाऱ्याशी बाेलणे करून देऊ का’, असे विचारल्यावर येथील कर्मचाऱ्याने दुर्लक्ष करीत ‘कार्ड हवे असतील, तर पैसे द्यावे लागतील. अन्यथा काही उपयाेग हाेणार नाही’, असे उलट उत्तर दिले. अनेक नागरिकांनी त्यांनादेखील असाच अनुभव या ठिकाणी अाल्याचे ‘डी.बी. चमू’कडे सांगितले.या दाेन संस्थांमार्फत पंचवटी परिसरात सुरू अाहे शुल्क अाकारून अाधार नाेंदणी केंद्र.

नोंदणीचे अाकारले २०० रुपये शुल्क
दिंडोरीरोडवरएका संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या अाधारकार्ड नोंदणी केंद्राकडून २०० रुपये शुल्क आकारले जात आहे. मी माझ्या मुलाची नोंदणी २०० रुपये देऊन करून घेतली. ए.बोडके, नागरिक

कोणतेही अर्ज स्वीकारणार नाही
जिल्ह्यातीलआधारकार्ड काढून देण्याची जबाबदारी कार्वी एजन्सीकडे देण्यात आलेली आहे. तसेच, अाधारसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जात नाही. जर कोणी असे करीत असेल तर संबंधितांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करू. त्यांचे अर्जही स्वीकारणार नाहीत. शाहनवाजशेख, जिल्हा व्यवस्थापक, कार्वी आधार कार्ड एजन्सी

चेहरापट्टी बघूनच बदलते शुल्क
झटपटअाधारकार्ड देण्यासाठी शहरात गेल्या दाेन िदवसांपासून काही अाधार केंद्र सुरू झाले असून, येथे गेल्यानंतर चेहरापट्टी बघून वेगवेगळे शुल्क अाधारकार्डसाठी अाकारले जात असल्याचे समाेर अाले. एका चिकित्सक वृद्धाकडून २०० रुपये घेतले गेले, तर विद्यार्थी िदसल्यानंतर मात्र हाच दर तीनशेपर्यंतही गेला. याच शिबिरांमध्ये पॅनकार्डसाठीही तीनशे रुपयांची अाकारणी केली जात असल्याच्या तक्रारी काही विद्यार्थ्यांनी केल्या.

ना सेतू कार्यालयाची परवानगी, ना आधार एजन्सीची...
पंचवटीविभागात अचानक अाधार केंद्रांचे पीक कसे उगवले, याचा शाेध लागत नव्हता. या संस्थांनी नेमकी काेणाची परवानगी घेतली याचा माग घेतल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील आधारकार्ड तयार करण्याची जबाबदारी असलेल्या कार्वी या अधिकृत एजन्सीकडूनदेखील परवानगी घेतली नसल्याचे सांगण्यात अाले. जिल्हा सेतू कार्यालयामार्फतही अशा पद्धतीने सुरू असलेल्या अाधार केंद्रासाठी काेणतीही मदत केली नसल्याचे स्पष्ट करण्यात अाले अाहे.
05 लाखांहून अधिक नागरिकांची नोंदणी गेल्या दोन वर्षांत कार्वी एजन्सीमार्फत शहरात झाली.
1.20 लाख नागरिकांची नोंदणी यंदा शहरातील तीन केंद्रांत करण्यात आली अाहे.


अधिकारीही अनभिज्ञच
अाधारकार्डनोंदणी करून देण्यासाठी शहरासह तालुक्यात काही ठिकाणी नागरिकांची २० ते ५०० रुपयांपर्यंत लूट सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणेने याकडे कानाडोळा केल्याने सर्वाचेच फावत आहे. सध्या सर्व नागरिकांना आधारकार्ड काढता यावे, यासाठी वेगाने नोंदणी सुरू आहे. मात्र, ही नोंदणी कोठे सुरू आहे याबाबत जबाबदार अधिकारीच अनभिज्ञ आहेत.

संस्थेसाठी घेतले जात आहेत अाधारकार्डचे पैसे...
विद्यार्थ्यांनाशाळेत आधारकार्ड बंधनकारक केल्याने, तसेच गॅस सिलिंडर अनुदानासाठी अाधारकार्ड लागत असल्यामुळे नागरिकांना अाता ‘आधार’साठी वणवण करावी लागत आहे. यासाठी परिसरात संस्थेच्या वतीने २०० रुपये घेऊन आधारकार्ड नोंदणी सुरू केली आहे. तुषारभोसले, खासगी संस्थेचे शहराध्यक्ष