आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भागीदारीच्या नावाखाली दांपत्याने युवकास घातला दीड काेटींचा गंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ठाणे येथील युवकास नाशकात एका खासगी कंपनीत भागीदारी देण्याच्या नावाखाली तब्बल दीड काेटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे. या प्रकरणी सरकारवाडा पाेलिस ठाण्यात एका दाम्पत्याविरुद्ध अार्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात अाली अाहे. 

अाफताब अमीन मर्चंट (रा. माजीवाडा, ठाणे) यांच्या तक्रारीनुसार, चंद्रशेखर श्रीरामसिंग परदेशी मीरा चंद्रशेखर परदेशी (रा. कॅनडा टॉवर्स, कॅनडा कॉर्नर) यांनी २८ सप्टेंबर २०१२ पासून आय होप हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. कंपनी सुरू केली होती. संचालक म्हणून त्यांनी अाफताब यांचे वडील पीरमहंमद मर्चंट यांना कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. कंपनीचे पाच हजार शेअर्स नावावर करण्याचेही मर्चंट यांना सांगण्यात अाले. मर्चंट यांच्याकडून परदेशी दाम्पत्याने वेळोवेळी एक कोटी ५८ लाख ११ हजार रुपये घेतले. मात्र, कुठलेही शेअर्स त्यांना देण्यात अाले नाही. दरम्यान, पीरमहंमद मर्चंट यांचे निधन झाल्यानंतर संशयितांनी नोंदणी कार्यालयात बनावट स्वाक्षरी करून त्यांनाच संचालक दाखवले. ही बाब लक्षात येताच अाफताब मर्चंट यांनी परदेशी दाम्पत्याकडे दीड कोटी रुपये आणि कंपनीचे शेअर्स मागितले. त्यास नकार दिल्याने मर्चंट यांनी सरकारवाडा अपहार आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली अाहे. पाेलिस उपनिरीक्षक ए. ओ. मोरे तपास करीत आहेत.
 
चाेर महिलांना अटक : मध्यवर्तीबसस्थानकावर महिलेच्या पर्समधील पैसे चाेरण्याच्या प्रयत्नात असलेल्या दाेन तरुणींना जागरूक प्रवाशांच्या मदतीने पकडण्यात अाले अाहे. अनिता पारलेस काळे ज्योती सहदेव पवार चिकलठाणा (अाैरंगाबाद) येथील रहिवासी असून त्यांच्याविरुद्ध सरकारवाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला अाहे. आरती राजेंद्र राख (जाधव संकुल) यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एकीने पर्स उघडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार फिर्यादी महिलेलच्या लक्षात येताच तिने एकीला पकडले. दुसरीने वाद घालण्याचा प्रयत्न करताच इतर प्रवाशांच्याही हा प्रकार लक्षात अाला. पाेलिसांनी दाेघींना ताब्यात घेतले.