आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • In The Nashik District A One And Half Lakh Mobile Holders Have Free Roaming

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात दीड लाख मोबाइलधारकांना रोमिंग फ्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सरकारी अखत्यारीतील बीएसएनएल दूरसंचार कंपनी १५ जूनपासून रोमिंग शुल्क आकारणी बंद करणार असल्याने जिल्ह्यातील दीड लाख मोबाइलधारकांना याचा लाभ मिळणार आहे. असे असले तरी देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असूनही भारत दूरसंचार निगमला, मात्र ग्राहक टिकवण्यात यश आलेले नाही. यामुळेच बीएसएनएलने ग्राहकांना खूश करण्याकरिता हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. यापूर्वीही बीएसएनएलने टॉकटाइम फ्रीच्या ऑफर देऊन ग्राहकांना खूश करण्याचा प्रयत्न केला होता.
ग्राहकांना फुल्ल नेटवर्क देण्यात इतर खासगी कंपन्यांच्या तुलनेत मात्र बीएसएसएनल सपशेल अपयशी ठरल्याने ग्राहकांनी बीएसएनएलकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता रोमिंग फ्रीचा निर्णय घेऊन आर्थिक तोटा सहन करूनही बीएसएनएलला नवीन ग्राहक जोडण्यात किती अपयश येते, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे. फोनसमवेत इंटरनेट यंत्रणाही बंद पडत असल्याने बँका, विद्यार्थी, गुंतवणूकदार यांनाही त्रास होत आहे. सातत्याने बीएसएनएल बंद पडून त्यांची दूरध्वनी सेवा खंडित होत असल्याने, बीएसएनएल म्हणजे बेभरोशाची सेवा, अशा शब्दांत ग्राहक नाराजी व्यक्त करीत आहेत.
जिल्ह्यात बीएसएनएलचे लाख ६९० लॅण्डलाइनधारक, तर लाख ५० हजार मोबाइल फोनधारक आहेत, तर ३० हजार ८७२ ब्राँडबँड कनेक्शन आहेत. मात्र, फोन बंद पडल्यानंतर टेलिफोन एक्स्चेंजमध्ये त्याची तक्रार करणाऱ्या ग्राहकांना अजिबात प्रतिसाद मिळत नाही. ग्राहक वैतागत असून, या सरकारी कासवछाप कारभाराविरोधात नाराज असल्याने खासगी कंपन्यांचे नेटवर्क घेत आहे. केंद्राने बीएसएनएलसाठी सकारात्मक धोरण राबवावे म्हणून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी बीएसएनएल बचावसाठी सातत्याने संपदेखील केले आहे. वरिष्ठ पातळीवरून योग्य त्या सुविधा आणि कामात सुसूत्रता आणण्यासाठी आवश्यक गाेष्टी मिळत नसल्यानेच बीएसएनएलची सेवा कोलमडल्याचा आरोप अधिकारी कर्मचाऱ्यांकडून पूर्वीपासूनच केले जाते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कुंभमेळ्यात मिळणार अखंडित नेटवर्क सेवा...