आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात २०० अतिक्रमणांवर हातोडा, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, नाशिकरोड परिसरात मोहीम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/ सिडको - महापालिकेच्या नगररचना अतिक्रमण विभागातर्फे सोमवारी शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. यात पाथर्डी फाटा, देवळाली कॅम्परोडवरील सुमारे १५० अतिक्रमित बांधकामे तोडण्यात आली. त्याचप्रमाणे द्वारका, नाशिकरोड, टाकळीरोड परिसरातही ५० ते ६० अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.

पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव, इंदिरानगर या संपूर्ण भागात राबविण्यात आलेल्या मोहिमेत प्लाम हॉटेल, गरमनरम हॉटेल, कृष्णा स्वीट्स, शांताराम पार्क, रोयल स्टील, जी. पी. स्वीट्स या मोठ्या बांधकाम असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई झाली. अतिक्रमण सहायक आयुक्त सोमनाथ वाडेकर, नगररचना उपभियंता संजय पाटील, राजीव आहेर, प्रवीण थोरात यांच्यासह नंदकुमार शिरसाठ, आर. डी. निकम, एस. सी. गोरे, डी. आर. पवार, मिलिंद जाधव आदी उपस्थित होते. ही मोहीम सुरू असताना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, कोठेही अतिक्रमण मोहिमेस िवरोध झाला नाही.

सहकार्य अपेक्षित
-महापालिकेनेज्या ठिकाणी अतिक्रमण काढले जाणार आहे, तेथे लाल खुणा केल्या आहेत. नागरिकांनी स्वत:च अतिक्रमण असल्यास ते काढून घ्यावे. आर.आर. गोसावी, विभागीय अधिकारी, सिडको

अद्यापही अतिक्रमणे...
-अनेकठिकाणी अनेक व्यावसायिक रस्त्यावरच दुकाने थाटत आहेत. त्यामुळे अस्वच्छता होते, वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यावरही कारवाई व्हावी. - अॅड.विलास देशमाने, नागरिक

पाथर्डी फाटा ते देवळाली कॅम्प या रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानासमोरील अतिक्रमण सोमवारी महापालिकेकडून जेसीबीच्या साहाय्याने जमीनदाेस्त करण्यात आले.