आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Incident In 2009 Stopped Tea Break Of Udhao Thackeray In Nashik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

4 वर्षांपूर्वी घडले होते असे काही ज्‍यामुळे उद्धव ठाकरेंचे चहापानही टाळले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- सन 2009.. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे ओझरहून सिन्नरला जाण्यापूर्वी एका शिवसैनिकाच्या घरी काही मिनिटे थांबले.. त्यानंतर काही तासांतच त्या शिवसैनिकाने पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. आता पुन्हा एकदा निवडणुका जवळ आल्या असताना ठाकरे यांच्या येथील आगमनाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना शनिवारी त्या घटनेची आठवण झाली आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ठाकरे यांचे कोणा कार्यकर्त्याच्या घरी चहापानही टाळण्यात आले. दरम्यान, ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा गटप्रमुख, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मेळावा कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात रविवारी (दि. 25) सकाळी 10.30 वाजता होणार आहे. परंतु, मेळाव्‍यापूर्वीच 4 वर्षांपूर्वीच्‍या घटनेचे स्‍मरण झाल्‍याने खबरदारी घेण्‍यात आली.

फटाके वाजलेच नाही

पक्षप्रमुखांच्या स्वागतासाठी बिटको उड्डाणपुलाखाली फटाक्यांची लड वारंवार पेटवूनदेखील वाजलीच नाही. बिटको चौकात ठाकरे 20 मिनिटे थांबले होते. त्यादरम्यान शिवसैनिकांनी फटाके फोडण्याचा प्रयत्न केला.

काय घडले होते 4 वर्षांपूर्वी? वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...