आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानकांवरील असुविधांकडेही एसटी प्रशासनाकडून दुर्लक्षच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्वच्छपिण्याचे पाणी नाही... ठिकठिकाणी कचरा साचल्याने परसलेली दुर्गंधी... बसायला बाकेच उरली नसल्याने उभे राहत बसची वाट बघणारे प्रवासी असे विदारक चित्र अाजघडीला शहरातील अनेक प्रमु‌ख बसस्थानकांवर दिसून येत आहे. ‘प्रवाशांच्या सुविधेसाठी’ असे बिरुद मिरविणाऱ्या एसटी महामंडळाच्या अनास्थेमुळे ही बसस्थानके केवळ असुविधांचेच अागार बनली असल्याचे दिसून येते.
शहरातील महामार्ग बसस्थानक, ठक्कर बझार, मेळा तसेच जुने सीबीएस बसस्थानक या ठिकाणी रोजच प्रवाशांची माेठी वर्दळ असते. मात्र, या स्थानकांवर प्रवाशांच्या तुलनेत सुविधांचा माेठा अभाव दिसून येताे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष, बाकांची दुरवस्था, बस उभ्या राहण्याची जागा ठरलेली नसणे अशा अनेक समस्यांमुळे या ठिकाणी प्रवाशांना राेजच गैरसाेयींचा सामना करावा लागत अाहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एकीकडे उत्पन्नवाढीसाठी धडपडणाऱ्या महामंडळाला सोयी-सुविधा पुरविण्यात मात्र अपयश येत असल्याने प्रवाशांची संख्या राेडावली अाहे. याबाबत महामंडळाने गांभीर्याने अात्मपरीक्षण करणे गरजेचे बनले अाहे. जेणेकरून प्रवाशांची गैरसाेय टळून त्यांना खराेखर सुविधांचा लाभ मिळू शकेल, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली अाहे.
दुर्गंधीचा त्रास, पिण्याच्या पाण्यासाठी हाल याची ही काही बाेलकी छायाचित्रे.

गैरसाेय थांबणार कधी..?
शाळांनासुट्या लागल्या असताना, तसेच लग्नसराईचे दिवस असताना बसस्थानकांवर माेठ्या प्रमाणावर गर्दी हाेत अाहे. सीबीएस, ठक्कर बझार, मेळा, महामार्ग बसस्थानकांवरही प्रवाशांची वर्दळ वाढली अाहे. मात्र, अशा स्थितीतही महामंडळ प्रशासन प्रवाशांच्या सुविधेसाठी तत्पर असल्याचे दिसत नाही. ज्यामुळे प्रवाशांकडून बऱ्याचदा खासगी पर्यायांना पसंती दिली जाते. प्रवाशांची ही गैरसाेय थांबवून महामंडळाने तातडीने सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी अनेक प्रवाशांनी केली अाहे.

निदान पिण्याच्या पाण्याची तरी सुविधा असावी...
^प्रवाशांच्या सुविधेसाठीएसटी प्रशासनाकडून बसस्थानक परिसरात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची तरी सुविधा करण्यात यावी. नियमित स्वच्छता करण्याबाबतही संबंधितांना सूचना करण्यात याव्यात. - जितेंद्र बच्छाव, प्रवासी

‘प्रवाशांच्या सुविधेसाठी’ ब्रीदवाक्य मिरविणाऱ्या एसटी महामंडळाच्या अनास्थेमुळे प्रवाशांना असे भरउन्हात बसेसच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे राहावे लागते.