आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेरीच्या घटनेनंतर साधुग्रामच्या सुरक्षेत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - साधुग्राममधील एका खालशात चोरी झाल्यानंतर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात अाला अाहे. साधू-महंतांकडे येणाऱ्या भाविकांवर नजर ठेवली जात आहे. नियमित दिसणाऱ्या संशयितांवर पोलिसांकडून पाळत ठेवण्यात येत आहे. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जागा बदलण्याचे काम सुरू असून, आणखी कॅमेेरे लावण्याची शक्यता आहे.
संपूर्ण साधुग्राम परिसरावर नजर ठेवण्यासाठी दहा मनोरे उभारण्यात अाले अाहेत. पोलिस चौक्या तत्काळ सुरू करण्यात आल्या आहेत. साधुग्राममध्ये येणारे मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले अाहेत.
यामार्गावर प्रवेश बंद : साधुग्रामपोलिस चौकी ते निलगिरी बाग, तपोवन क्रॉसिंग ते साधुग्राम, मिर्ची हॉटेल चौफुली ते साधुग्राम, पंचवटी महाविद्यालय ते साधुग्राम, नवीन शाहीमार्ग ते साधुग्राम, मयूर ट्रॅक्टर ते साधुग्राम हे रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आले.