आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगारांच्या पगारी सुटीमुळे वाढणार मतदानाचा टक्का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विधानसभा नि वडणुकीसाठी नि वडणूक आयोगाने १५ ऑक्‍टोबरला पगारी सुटी देण्याचे निर्देश दिले असल्याने, सर्व कामगारवर्गाला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मात्र, सुटी असूनही ज्यांच्या बोटावर शाई नसेल अशा कामगारांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अर्थात सातपूर अाणि अंबडसह जिल्ह्यातील सर्वच औ‍द्यागिक वसाहतींमधील उद्योगांनाही या दिवशी सुटी द्यावी लागणार असल्याने, कामगार वर्गातूनही मतदानाचा टक्का वाढणार अाहे.

मतदान करून राज्यघटनेने दिलेला हक्क कामगारांना बजावता यावा, यासाठीच ही सुटी असून, मतदानाच्या दुसऱ्या कंपनीत प्रवेश करताना मात्र बाेटावरील शाई तपासली जाणार असल्याने, ही सुटी मतदान करण्याऐवजी एन्जॉय करणाऱ्यांना महागात पडणार आहे. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी उद्याेजक कामगार संघटनांची सोमवारी महत्त्वाची बैठक कामगार उपायुक्तांनी बोलाविली आहे. मतदानाचा टक्का वाढावा याकरिता लोकसभा निवडणुकीवेळी मतदानासाठी सुटी देण्यासह मतदान केले किंवा नाही, याची शहानिशा बोटावरील शाई तपासून करण्याचे आदेश कामगार उपायुक्तांनी काढले होते. यामुळेच जो मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आला, त्यात कामगारांचा वाटा महत्त्वाचा होता. हीच पुनरावृत्ती होणार असून, कामगारांनी मतदान करावे, यासाठी "निमा'कडून सर्वच उद्योजक सदस्यांची लवकरच बैठक बाेलाविली जाणार अाहे. कामगार अायुक्त कार्यालयाकडून यासंदर्भात लवकरच आदेश निघणार आहेत.
उद्योजकांची लवकरच बैठक
सदस्यउद्योजकांची लवकरच बैठक घेतली जाणार असून, कामगारांत जनजागृती प्रोत्साहनासाठी परिपत्रकही काढू. मतदानाचा टक्का यामुळे वाढेल. -मंगेश पाटणकर, सरचिटणीस,निमा
पगारी सुटी द्यावी लागेल
कामगारांच्या मतदानाबाबत साेमवारी बैठक बोलाविली आहे. त्यांना या दिवशी कामगारांना पगारी सुटी द्यावी लागेल. आर.एस. जाधव, कामगारउपायुक्त, नाशिक