आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमआयडीसीत चंदनचोरांचा धुडगूस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सातपूर येथील औद्योगिक वसाहतीच्या कंपनी आवारातील चंदनाच्या झाडांची चोरी करीत चंदनचाेरांनी अक्षरश: येथे धुडगूस घातलेला आहे.
आगाऊ धमकी देत सातपूर औद्योगिक वसाहतीतील एशिया ऑटोमोटिव्हच्या आवारातील चंदनाचे झाड कापून पोलिसांनाच आव्हान देण्याच्या घटनेच्या दिवशीच, २२ मे रोजी रात्री अन्य एका कंपनीच्या आवारातूनही तीन चंदनाचे वृक्ष तोडून नेल्याचे उघड झाले आहे. गेले दीड वर्ष शांत बसलेले चंदनचोर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्याचे या दोन्ही घटनांतून समोर आले असले तरी पोलिस तक्रार दाखल करण्याचे फक्त सोपस्कार पार पाडत असल्याने उद्योजकांत चिंतेचे वातावरण आहे.
नाईस परिसरातील एशिया ऑटोमोटिव्ह आवारात चंदनचोरी करण्याआधी १५ मे रोजी चोरट्यांनी कंपनीच्या सुरक्षारक्षकाला झाड तोडून नेण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह व्यक्त केले जात असताना उशिरा का होईना, पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
‘दिव्य मराठी’त या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आता सातपूर येथील दुसऱ्या एका कंपनीतही त्याच रात्री तीन चंदनवृक्ष चोरल्याचे समोर आले आहे. अद्याप याबाबत कोणतीही तक्रार पोलिसांत दाखल झालेली नसली तरी दोन दिवसांत ती दाखल होणार आहे. पोलिसांच्या सौम्य भूमिकेमुळे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा गस्त पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.
बातम्या आणखी आहेत...