आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात उन्हाची तीव्रता वाढली, पारा प्रथमच ४० अंशांच्या पार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत अाहे. गेल्या तीन दिवसांपासून तपमानात सातत्याने वाढ हाेत अाहे. गुरुवारी कमाल तपमान ४०.३ अंश सेल्सिअस झाल्याने तीव्र उकाडा जाणवत होता. सकाळी ११ वाजेपासून ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत तीव्र उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. उन्हाच्या तीव्र झळांमुळे शहरवासीय त्रस्त झाले असून, थंडावा देणाऱ्या शीतपेयांची मागणी वाढली अाहे.
नाशिक शहरात दोन ते तीन दिवसांपासून कमाल तपमानात वाढ होत आहे. बुधवारी कमाल तपमान ३८.६, तर किमान २०.२ अंश सेल्सिअस, तर गुरुवारी कमाल तपमान हे ४०.३, तर किमान ३८.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. एक दिवसात दोन अंशांनी वाढ झाल्याने गुरुवारी उकाडा जावणत असल्याने कॉलनी परिसरामध्ये शुकशुकाट जाणवत होता. तसेच, उन्हाची तीव्रता जास्त असल्याने रसवंती, आइस्क्रीम पार्लर, ज्यूस सेंटर या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती.

यंदा कमाल तपमान प्रथमच ४० अंशांच्या वर गेले आहे. एरवी, दरवर्षी साधारणपणे एप्रिलच्या मध्यानंतरच तपमानात कमालीची वाढ हाेऊन ते ४० अंशांपेक्षा जास्त हाेते. पण, यंदा तपमानाने एप्रिलच्या मध्यावरच चाळिशी पार केली अाहे. मात्र, किमान तपमान घटले आहे. मेपर्यंत कमाल तपमान ३७ ते ४० अंशांच्या दरम्यान राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले. मात्र, सध्याचे वातावरण पाहता तपमान मेमध्ये ४० पेक्षा बरेच पुढे जाण्याची भीती नागरिकांना भेडसावत अाहे. मागील आठवड्यात तपमान ३३ ते ३४ अंशांपर्यंत स्थिरावले होते. मात्र, दोन दिवसांपासून त्यात झपाट्याने वाढ झाली आहे.
नाशिक शहरातील तपमानात दिवसेंदिवस वाढ हाेत असून, शहरवासीय उष्म्याने हैराण झाले अाहेत. गुरुवारी नेहमी वर्दळ असलेल्या संत गाडगे महाराज पुलावर कडक उन्हामुळे असा शुकशुकाट हाेता.
बातम्या आणखी आहेत...