आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डासांच्या महाउच्छादाची आता ‘अाॅनलाइन’ गुणगुण, महापालिकेच्या अाधुनिक प्रणालीवर २८२ तक्रारी प्राप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नदीपात्रात वाढलेल्या पाणवेली, शहरातील अस्वच्छता यामुळे डासांची उत्पत्ती माेठ्या प्रमाणात वाढली असून, नगरसेवकही यावर उपाय शाेधण्यात हतबलता दर्शवित असल्याने नागरिकांनी अाॅनलाइन प्रणालीद्वारे थेट पालिका प्रशासनाकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली अाहे. गेल्या महिनाभरात तब्बल २८२ तक्रारी केवळ डासांसंदर्भात प्राप्त झाल्या अाहेत. अाॅनलाइन तक्रारींची दखल तातडीने घेतली जात असल्याने यापुढील काळात तक्रारींची संख्या वाढण्याची शक्यता अाहे.
कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराची काहिली हाेत असताना डासाचा उपद्रव कमालीचा वाढल्याने शहरवासीयांची रात्रीची झाेप उडाली अाहे. जवळपास सर्वच भागात डासांचा उच्छाद वाढला अाहे. नाशिकराेड भागात ही समस्या प्रकर्षाने जाणवत अाहे. नदीपात्रात पाणवेली वाढल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे सांगितले जाते. डासांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांनी परिसरातील नगरसेवकांकडे तक्रारी करण्याचा सपाटा लावला अाहे. परंतु, नगरसेवकांचा फारसा दबदबा उरलेला नसल्याने अखेर नागरिकांनी महापालिकेची अाॅनलाइन प्रणाली वा प्रत्यक्ष अर्जफाट्यांद्वारे तक्रारी करण्यास सुरुवात केली अाहे. अाॅनलाइन प्रणालीचा वापर करणाऱ्या नाशिककरांची संख्याच अल्प असल्याने त्याद्वारे अालेल्या २८२ तक्रारी या समस्येचे गांभीर्य स्पष्ट करण्यासाठी पुरेशा अाहेत.

पाणवेली प्रजाेत्पादनासाठी पाेषक : नदीपात्रातमाेठ्या प्रमाणात सांडपाणी साेडले जाते. सांडपाणी पाणवेलींना पाेषक असल्याने बहुतांश नदीपात्रात पाणवेलींचे जंजाळ वाढल्याचे दिसते. पाणवेलीच्या दाट पानांमधील अंधारी जागा प्रजाेत्पादनासाठी पाेषक असते. त्यामुळे नदीपात्राच्या अासपासच्या परिसरात सर्वाधिक डास अाढळून येत अाहेत.

टाकळीनाल्याने वाढविली समस्या : टाकळीयेथील खुल्या नाल्यांमुळे दुर्गंधीही माेठ्या प्रमाणात परसली अाहे. परिणामी, नागरी अाराेग्य धाेक्यात अाले अाहे. या नाल्यामुळे डासांची उत्पत्तीही वाढली.

नाशिकराेडला सर्वाधिक तक्रारी : टाळकुटेश्वरमंदिर ते दसक-पंचक येथे डासांचा सर्वाधिक उपद्रव असल्याच्या तक्रारी अाहेत. सर्वाधिक तक्रारी नाशिकराेड विभागातून असून कमी तक्रारी पश्चिम विभागातून अाहेत.
अाराेग्याशीसंबंधित ६, ६१८ तक्रारी : अाराेग्यविभागाशी असलेल्या तक्रारींमध्येही माेठी वाढ झाली अाहे. महिन्याभराच्या काळात या विभागाशी संबंधित तब्बल सहा हजार ६१८ तक्रारी अाॅनलाईन प्रणालीद्वारे अाल्या अाहेत.
पाणवेली प्रजाेत्पादनासाठी पाेषक : नदीपात्रातमाेठ्या प्रमाणात सांडपाणी साेडले जाते. सांडपाणी पाणवेलींना पाेषक असल्याने बहुतांश नदीपात्रात पाणवेलींचे जंजाळ वाढल्याचे दिसते. पाणवेलीच्या दाट पानांमधील अंधारी जागा प्रजाेत्पादनासाठी पाेषक असते. त्यामुळे नदीपात्राच्या अासपासच्या परिसरात सर्वाधिक डास अाढळून येत अाहेत.

टाकळीनाल्याने वाढविली समस्या : टाकळीयेथील खुल्या नाल्यांमुळे दुर्गंधीही माेठ्या प्रमाणात परसली अाहे. परिणामी, नागरी अाराेग्य धाेक्यात अाले अाहे. या नाल्यामुळे डासांची उत्पत्तीही कमालीची वाढली अाहे.

नाशिकराेडला सर्वाधिक तक्रारी : टाळकुटेश्वरमंदिर ते दसक-पंचक परिसरात डासांचा सर्वाधिक उपद्रव असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या अाहेत. सर्वाधिक तक्रारी नाशिकराेड विभागातून अाल्या असून सर्वात कमी तक्रारी पश्चिम विभागातून अाहेत.

अाराेग्याशी संबंधित ६, ६१८ तक्रारी : डासांच्यासमस्येने उग्र रूप धारण केलेले असताना दुसरीकडे अाराेग्य विभागाशी असलेल्या तक्रारींमध्येही माेठी वाढ झाली अाहे. महिन्याभराच्या काळात या विभागाशी संबंधित तब्बल सहा हजार ६१८ तक्रारी अाॅनलाईन प्रणालीद्वारे अाल्या अाहेत.

डास निर्मूलनासाठी पालिकेच्या उपाययाेजना
{ नदीपात्रातील पाणवेली काढण्यास सुरुवात.
{ टाकळी मलनिस्सारण केंद्राजवळ युद्धपातळीवर स्वच्छता.
{ अाैषधफवारणी धूर-फवारणीच्या प्रमाणात वाढ.
{ प्रत्येक तक्रारीची दखल घेण्याची अायुक्तांची सूचना.
{ घराेघर जाऊन केली जाते पाण्याची तपासणी.

या संकेतस्थळावर करा तक्रारी
http://www.nashikcorporation.in या संकेतस्थळावर अाराेग्याशी वा अन्य विभागाशी संबंधित तक्रारी करण्याची व्यवस्था अाहे. यात ‘कम्प्लेंट’ या सदराखाली तक्रार करता येते. अापली तक्रारीची दखल काेणत्या अवस्थेत अाहे याविषयी माहितीही मिळू शकते. महापालिकेच्या स्मार्ट नाशिक या अॅप्लिकेशनद्वारेही तक्रार दाखल करता येते.

नदीपात्राजवळच सर्वाधिक तक्रारी
^नदीपात्रात पाणवेली वाढल्याने डासांचे प्रमाण वाढले अाहे. दरवर्षी पाणवेली काढण्याचा ठेका दिला जाताे. यंदा हे काम काहीसे उशिरा सुरू झाले अाहे. दरराेज १५-२० कर्मचारी पाणवेली काढण्याचे काम करतात. नदीपात्राजवळच डासांच्या सर्वाधिक तक्रारी अाहेत. - वैशाली पाटील, जीवशास्त्रज्ञ,महापालिका