आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखोंची ऑनलाइन फसवणूक, पोलिसांचे हातावर हात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पदवी,डिप्लोमा अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर चांगली नोकरी मिळविण्यासाठी युवकांची धडपड सुरू होते. अशा प्रयत्नात काहींना नोकरी मिळतेही, मात्र बेरोजगार तरुणाई अस्वस्थ असते. नोकरीवरच भवितव्य अवलंबून असल्याने या ना त्या मार्गाने नोकरी मिळविण्याचा तरुणांचा प्रयत्न सुरू असतो. नोकरीमागे धावणाऱ्या या तरुणांची मानसिकता ओळखून त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून फसविण्याचे प्रकार दविसेंदविस वाढत चालले आहेत. सरकारी खासगी कंपन्यांमध्ये मोठ्या पगाराचे आमिष दाखवून बेरोजगारांना वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे डिपॉझिट करण्यास सांगितले जाते. मात्र, पैसे भरल्यानंतर या लोकांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नसल्याच्या घटना समोर येत आहेत.

अशी होते फसवणूक
देशातील अनेक मोठ्या शहरांतून नोकरीची संधी देणाऱ्या इ-मेलसंदर्भात तक्रारी दाखल करण्यात झाल्या आहेत. बड्या कंपन्यांची नावे वापरून कंपनीत मोठी भरती सुरू असल्याचे भासविले जाते. तुमची नविड झालेली असून, ही नविड जवळपास निश्चित असल्याने कंपनीतर्फे तुमच्या जाण्या-येण्याचाही खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, मुलाखतीला येण्यापूर्वी डिपॉझिट म्हणून काही पैसे भरणे आवश्यक आहे. तेव्हा अमुक खात्यावर १० ते १५ हजार रुपये रुपये भरण्यास सांगितले जाते. खासगी कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी मिळत असल्याचे पाहून तरुण या बनावट इ-मेल्सच्या जाळ्यात अडकतात.

ऑनलाइन शाॅपिंग मध्येही वाढती फसवणूक
ऑनलाइनशॉपिंगमध्ये आकर्षक आॅफर्स दिल्या जात असल्याने आॅनलाइन शाॅपिंगला सध्या मोठी पसंती दिली जात आहे. मात्र, याद्वारेही ग्राहकांची फसवणूक होत असल्याची उदाहरणे समोर आली आहेत.

अशी केली जाते फसवणूक
इंटरनेटच्या माध्यमातूनच स्पर्धा परीक्षांसह खासगी कंपन्यांची भरतीप्रक्रियादेखील गेल्या दोन वर्षांत ऑनलाइन झाली आहे. त्यामुळे केवळ शहरच नव्हे तर ग्रामीण भागातील तरुणही इंटरनेटचा वापर करू लागले आहेत. भरतीप्रक्रियेचा अर्ज सादर करण्यापासून नविड झालेल्या उमेदवारांच्या याद्या प्रसदि्ध करण्यापर्यंत सर्वत्र इंटरनेटचा वापर होत आहे. याच परिस्थितीचा फायदा बनावट इ-मेल पाठविणारे भामटे घेत आहेत. राजमुद्रा वॉटरमार्कचा वापर हा एकप्रकारे देशद्रोह असल्याने केंद्र सरकारने अशा वाढत्या प्रकारांबाबत कायद्यात दुरुस्ती करावी, तसेच पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नावानेही होतेय फसवणूक
मलालाॅटरी लागल्याचा इ-मेल आला होता. त्यात अभनिंदन करतानाच संपूर्ण वैयक्तिक माहितीही मागविण्यात आली होती. ही फसवणूक असल्याची खात्री झाल्याने मी तत्काळ तो इ-मेल रिझर्व्ह बँकेच्या इ-मेलवर पाठवला. मात्र, रिझर्व्ह बँकेकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. दीपकआव्हाड, उद्योजक

पोलिसांकडून टाळाटाळ
माझे बँके खाते हॅक करून सायबर गुन्हेगारांनी रकमेचा अपहार केला. याबाबत तक्रार करण्यास गेलो असता गंगापूर पोलिसांनी सातपूर तर, सातपूर पोलिसांनी गंगापूर पोलिसांत पाठविले. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. मात्र, चौकशीअंती सीमकार्ड रजिस्टरच नसल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हेगारांचा शोध मात्र लागलाच नाही. -जीवन रायते
थेट प्रश्न
देशाच्या राजमुद्रेसह बड्या कंपन्यांच्या नावाचा बनिधास्त वापर होऊनही यंत्रणांची डोळेझाक सुरूच
नोकरीमागे धावणाऱ्या बेरोजगार युवकांना इंटरनेटच्या माध्यमातून गंडा घालणारी टोळी देशभरात सक्रिय आहे. मानसिकता ओळखून या तरुणांना गंडा घालण्याचा उद्योग अशा टोळ्यांकडून सुरूच आहे. फसवणूक झालेल्या युवकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे गरजेचे असतानाही, केवळ अर्ज घेऊन तक्रारदारांची बोळवण करण्यातच पोलिस यंत्रणा धन्यता मानत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच गेल्या सात महनि्यात एकट्या नाशिक शहरात ज्या १९ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली; त्यात फसवणुकीऐवजी सोशल मीडियावरील बदनामीसंदर्भातील गुन्ह्यांचीच संख्या अधिक आहे. पोलिस तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी डी. बी. स्टारकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यासंदर्भातील माहिती घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने सायबर गुन्हे शाखेत चौकशी केली असता "आमच्याकडे फक्त दाखल गुन्ह्यांची संख्या असून, सविस्तर माहिती संबंधित पोलिस स्टेशनकडेच मिळू शकेल', असे बेजबाबदारपणाचे उत्तर देण्यात आले. यावरूनच ऑनलाइन फसवणुकीबाबत पोलिसांची मानसिकता नेमकी कशी आहे, हे स्पष्ट होते. या संपूर्ण विषयावर डी. बी. स्टारने टाकलेला प्रकाशझोत...
शहरातील प्रफुल्लपवार या अभियंत्याला बनावट नियुक्तीपत्र देऊन २५ हजारांना गंडा घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. शासकीय राजमुद्रा वॉटरमार्क असलेल्या कागदाचा यासाठी गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या स्वर्ण जयंती स्वयंरोजगार योजनेशी साम्य असलेल्या swarnjayantirozgaryojana.com या संकेतस्थळावरील एका जाहिरातीनुसार ‘ग्राहक सेवा प्रतिनिधी’ पदासाठी त्यांनी अर्ज केला होता. कामावर रुजू होण्यापूर्वी लॅपटॉप मोबाइलसाठी १३ हजार ८५० रुपये स्टेट बँकेच्या ३४९२०८१३०३२ या खात्यात भरण्यास सांगण्यात आले. नियुक्तीपत्रावर भारत सरकार, राजमुद्रा, नोंदणी क्रमांक, सही-शिक्के, संकेतस्थळ असल्याने त्यावर विश्वास ठेवून प्रफुल्ल पवार याने संबंधित खात्यात १३ हजार ८५० रुपये भरले होते. मात्र नंतर कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
काॅलेजरोडवरील शरदतानाजी देवरे यांना टी. बी. एल. बँक बांजुल गांबिया मिस ओला विल्यम यांनी पार्सल पाठविले होते. यासाठी त्यांना कस्टम ड्युटी इतर खर्चासाठी पैसे पाठविण्याचा एसएमएस आला. यात आयसीआयसीआय बँकेतील खात्यावर पैसे टाकण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी निक्की एंटरप्रायजेसच्या खात्यावर ९९,५००, खुशी प्रदीप खन्ना यांच्या खात्यावर ५५ हजार, अजय एंटरप्रायजेस यांच्या खात्यावर लाख रुपये एजंट माॅरीस यांच्या नावावर १० हजार असे एकूण लाख १४ हजार ५०० रुपये जमा केले. मात्र, वमिानतळावर त्यांचे पार्सलच आले नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणुकीसंदर्भातील सर्व पुरावे देऊनही या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी ते गेल्या दीड वर्षांपासून पोलिस आयुक्तालयासह स्थानिक पोलिस स्टेशनाचे उंबरठे झिजवत आहे.
एका युवकालाथेट अमेरिकेतून तुम्हाला चारचाकी गाडीचा लकी ड्राॅ लागल्याचा इ-मेल आला. हे बक्षीस मिळविण्यासाठी तुमच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती आम्हाला पाठवा. असे सांगण्यात आले. गुगलच्या नावाने आलेल्या या मेलमध्ये संपर्कासाठी +४४७९३७४५२६७८ हा क्रमांक देण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या नावानेही अशा प्रकारचे इ-मेल्स येत असल्याची उदाहरणे आहेत.
शहरातील फसवणूकझालेल्या एका युवकाने नाव छापण्याच्या अटीवर माहिती दिली. मोबाइलमधील परदेशी ऑनलाइन शॉपिंग क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अॅप्लिकेशनद्वारे या युवकाने कॅमेऱ्याची ऑर्डर दिली होती. त्यासाठी त्याने अॅप्लिकेशनद्वारेच पैसेही भरले. त्यानंतर त्याला इ-मेलद्वारे ऑर्डरचा सर्व तपशील आणि ट्रॅकिंग नंबरही मिळाला. तब्बल महनिाभरानंतर नाशिकरोड येथील "इएमएस'कडून गोळे कॉलनी येथील पोस्टात त्याचे पार्सल आले. घरी आल्यानंतर ते पार्सल पोस्टमनसमोरच उघडल्यानंतर त्यात कॅमेराच नव्हता. केवळ केबल आणि अन्य अॅक्सेसरीच त्यात होत्या. तरुणाने तातडीने फोटो काढून त्याचा रिपोर्ट संबंधित अॅप्लिकेशनद्वारे विक्रेत्याकडे पाठवला. एवढे होऊनही संबंधित विक्रेत्याने आमच्याकडे मात्र कॅमेऱ्यासह त्याचे वजन योग्य असल्याचा मेसेज पाठवला. हे प्रकरण अद्याप संबंधित ऑनलाइन शॉपिंगच्या अखत्यारित पडून आहे. हा तरुण नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेला असता, फसवणूक परदेशातील संस्थेकडून झाल्याने तुम्ही तिकडेच जा, असा अजब सल्लाही देण्यात आला.
{इंटरनेटच्या माध्यमातूनबेरोजगार युवकांची आॅनलाइन शाॅपिंग करणाऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यावर सायबर क्राइम विभागाने काय उपाययाेजना केल्या?
- नागरिकांचीफसवणूक होऊ नये, यासाठी आम्ही बँकांसह मोबाइल कंपन्यांना आवश्यक सूचना केलेल्या आहेत. तरीही अशा गुन्ह्यांमध्ये त्यांच्याकडून हलगर्जीपणा होत असल्याचे समोर येत असते.

{राजमुद्रेचा वापरकंपन्यांच्या लेटरहेडसारख्या कागदपत्रांचा वापर करून बेरोजगारांना काॅल लेटर दिले जातात. अशा प्रकरणात किती गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली?
- फसवणूककरणारे सराईत गुन्हेगार असतात. यासाठी ते बनावट सीमकार्ड बनावट बँक खात्यांचा वापर करतात. त्यामुळे अशा प्रकरणांच्या मुळाशी जाण्यात मोठ्या अडचणी येत असतात.

{कोणत्या कागदपत्रांच्याआधारे ते बँकेत खाते उघडतात?
- दिल्ली,हरियाणा, बिहार, यूपीतील गुन्हेगार नवनवीन पद्धती वापरून फसवणूक करतात. जेथे पैशाचा विषय येतो, तेथे नागरिकांनीच सतर्कता बाळगायला हवी.