आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षांच्या मुलाने तयार केले शिक्षिकेचे फेक अकाउंट, ब्रेकअप नंतर प्रेयसीचे फोटो पोर्नसाइटवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक : मुलींचे नग्न फाेटाे पाॅर्नसाइटवर टाकणे, फाेटाे एडिट करून त्याला अश्लील रूप देणे, मुलींच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून तिची बदनामी करणे, महिलेचा बदला घेण्यासाठी तिच्या नावाचा गैरवापर करणे असे प्रकार सध्या नाशिकमधील साेशल मीडियावर सर्रासपणे सुरू असल्याचे सायबर पाेलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांवरून स्पष्ट हाेत अाहे.
 
विशेष म्हणजे यात मिसरूड फुटले नाही, अशीही मुले अाराेपी अाहेत. मुलांच्या अशा विकृत कृतींमुळे अनेक मुलींना जगणेही असह्य झाले अाहे. त्यामुळे पालकांनाे सावधान, अापली मुले साेशल मीडियाच्या जाळ्यात अशाप्रकारे अाेढले तर जात नाही ना याची काळजी घेण्याची अाता प्रत्येकावर वेळ अाली अाहे. 
 
नाशिकमध्ये सायबर क्राइम पाेलिस ठाण्याचे उद‌्घाटन हाेऊन अवघे दाेन महिने उलटले असून, साेशल मीडियावर मुलींचे अाक्षेपार्ह फाेटाे टाकून बदनामीचे प्रकार, दाेन महिन्यात सहा गुन्हे 
या कालावधीत सायबर फसवणुकीसंदर्भात १२ गुन्हे दाखल झाले अाहेत. त्यातील सहा गुन्हे हे लैंगिक अपराधांसंदर्भातील अाहेत. या सहाही गुन्ह्यांतील अाराेपींना पाेलिसांनी अटक करून पुढील तपास सुरू केला अाहे. साेशल मीडियावर जेव्हा बदनामीकारक मजकूर वा छायाचित्र व्हायरल हाेतात त्यानंतर संबंधितांना काय सहन करावे लागले असेल याची कल्पनाही केलेली बरी. 
 
सामाजिक शांततेला धाेका 
सामाजिक घडमाेडींसह खासगी अायुष्यातील बऱ्या वाईट अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी साेशल मीडियाचा जन्म झाला खरा; मात्र या माध्यमाचा वापर करून अनेक अपप्रकार सुरू झाल्याने सामाजिक शांततेलाच धाेका निर्माण झाला अाहे. विशेषत: किशाेर अाणि तरुणवयीन मुलींना जाळ्यात अडकवून त्यांचे छायाचित्र व्हायरल करणारे अाणि केवळ दुसऱ्याची बदनामी करायची म्हणून त्यांच्या नावाचे बनावट अकाउंट करणाऱ्या ‘महाभागांचा’ वावर अाता या सामाजिक माध्यमांवर वाढला अाहे. त्यात अनेक मुलींना माेठाच मनस्ताप सहन करावा लागत अाहे. कुटुंबेच्या कुटुंबे उद‌्ध्वस्त हाेण्याची शक्यता या प्रकारांमुळे निर्माण झाली अाहे.
 
या पार्श्वभूमीवर जनजागृतीच्या उद्देशाने महाजाल ‘लैंगिक छळाचे महाजाल ही वृत्तमालिका अाजपासून सुरू करीत अाहाेत. यात नाशिकच्या संदर्भातील प्रकरणे, गुन्हेगारांना हाेणाऱ्या शिक्षा, तपासातील अडचणी, स्कँडलपासून वाचण्यासाठीच्या उपाययाेजना अादींविषयीची माहिती दिली जाईल. 
 
मैत्रिणीच्या सिमकार्डच्या अाधारे फेक अकाउंट 
नातेवाइकाने मारहाण केल्याचा राग मनात ठेवून १८ वर्षीय चांदवडच्या युवकाने फेसबुकवर महिलांच्या नावाने दाेन बनावट अकाउंट तयार केले. त्यात ज्याने मारहाण केली त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत या युवकाने चॅट सुरू केले. सुरुवातीला काही काळ केवळ गप्पांपर्यंत हे प्रकरण सुरू हाेते. त्यानंतर नातेवाइकाला त्याच्या पत्नीविषयी अश्लील संदेश पाठवून हैराण केले जाऊ लागले. विशेष म्हणजे मैत्रिणीचे सिमकार्ड घेऊन त्याचा वापर करून या ‘बहाद्दरा’ने फेसबुकचे अकाउंट सुरू केले हाेते. 
 
सोशल मीडियाचा वापर अतिशय सतर्कतेने करा 
सोशलमीडिया विशेषत: फेसबुक, व्हाॅटस्अॅप आणि इतर माध्यमांचा वापर वाढत आहे. फेसबुकचा वापर करताना अतिशय सतर्कता बाळगली पाहिजे. यावर वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळावे. विशेषत: महिलांनी खबरदारी बाळगावी. फसवणूक झाली असल्यास तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. -डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त 
 
तक्रारींसाठी करा संपर्क 
सायबर क्राइमशी संबंधित काेणाच्या काही तक्रारी असल्यास संबंधितांनी ९७६२१००१०० या व्हॉट‌्सअॅप क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा. तक्रारदाराची इच्छा असल्यास नाव गाेपनीय ठेवले जाते. 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या का घडत आहे असे प्रकार.... 
 
बातम्या आणखी आहेत...