आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूररोड येथे ५० अतिक्रमणांवर जेसीबी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंगापूररोडवरीलहॉटेल्सची अतिक्रमणे जमीनदोस्त करीत मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने रस्ते मोकळे केले. यात हॉटेल्स आणि दुकानांबाहेरील अनधिकृत बांधकामे, फलक, अतिक्रमित प्रवेशद्वार आदी सुमारे ५० अतिक्रमणांवर जेसीबी फिरविला. काही हॉटेल्सच्या अनधिकृत बांधकामांकडे मात्र अतिक्रमण निर्मूलन पथकाने काणाडोळा केल्याने मोहिमेला गालबाेट लागले आहे.

सकाळी ११ वाजेला पंडित कॉलनी येथील अतिक्रमण तोडण्यात आले. त्यानंतर थेट जेहान सर्कल गाठत तेथून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. सोमेश्वरपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेले हॉटेल्स, दुकाने, पेट्रोलपंप आदींचे अतिक्रमणे सायंकाळी सहा वाजेपर्यंत हटविण्यात आली. त्यानंतर मात्र मोहीम आटाेपती घेण्यात आली. त्यामुळे या मोहिमेच्या परिणामकारकतेबाबत आणि एकूणच त्याबाबतच्या ‘नियोजना’बाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

पथकाचीदुटप्पी भूमिका
अतिक्रमणनिर्मूलन पथकाने काही बड्यांच्या हॉटेल्सची अतिक्रमणे काढण्यासाठी संबंधितांना पुरेसा वेळ िदला. मात्र, काही हॉटेल व्यावसायिकांनी विनंती करूनही त्यांच्या हॉटेल्सवर जेसीबी फिरविण्यात आला. त्यामुळे संबंधितांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोहीम राबविताना सर्वांना समान न्याय का लावला जात नाही, असा सवाल या वेळी काही हॉटेलमालकांनी केला. काही राजकीय मंडळींच्या हॉटेल्सची अतिक्रमणे काढण्याचा देखावा करण्यात आला. प्रत्यक्षात यामुळे रस्ते मोकळेच झाले नाहीत. परिणामी ही मोहीम पुरेशी प्रभावी ठरल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून आली. महापालिका प्रशासनाच्या या दुटप्पीपणाची चर्चा नागरिकांत सुरू होती.
पार्किंगच्या जागेवर हॉटेल अन् वाहने मात्र रस्त्याच्या कडेला
गंगापूररोडवरीलकाही हॉटेल्सला पार्किंगसाठीच्या स्वतंत्र जागाच नाही. पार्किंगच्या जागेवर बांधकाम करून संरक्षक भिंतीवर पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहने या भिंतीबाहेर म्हणजे रस्त्यावर उभी राहतात. परिणामत: रस्ते अरुंद होऊन वाहतुकीचा खाेळंबा होतो. गंगापूररोडच्या रुंदीकरणाआधीच्या या हॉटेल्स असून, त्यावेळच्या नियमानुसार बांधकाम करण्यात आल्याचा दावा संबंधित हॉटेलमालकांकडून केला जात आहे.
रुंदीकरणामुळे पार्किंगच्या जागा रस्त्यात आल्याचे ते सांगतात. वास्तविक, काेणत्याही रस्त्याचे रुंदीकरण करताना त्यात येणारी बांधकामे पाडलीच जातात. त्यामुळे गंगापूररोडच्या हॉटेल व्यावसायिकांचे समर्थन थिटे पडत आहे. रस्ते मोकळे करून देणे हे प्रत्येक हॉटेल व्यावसायिकाचे कर्तव्य असून पार्किंगसाठी त्यांनी हॉटेलची जागा वापरावी, अशी मागणी शहरातील सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.