आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Increment Issue At Nashik, Women Complaint To Mayor

अतिक्रमणाने सोसायटी वेठीस, महिलांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - एका रहिवाशाने केलेल्या अतिक्रमणामुळे संपूर्ण सोसायटीला वेठीस धरले असून, यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय पक्षाचा वापर करत संबंधित अतिक्रमणधारक दहशत निर्माण करत असल्याचा आरोप करतानाच, अतिक्रमणाची महापालिकेने तत्काळ दखल घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा येथील इशारा महिलांनी दिला आहे.

इंदिरानगरानगर परिसरात असलेल्या सुचितानगर येथील राज अपार्टमेंट सोसायटीत २२ फ्लॅट्स असून, त्यातील क्रमांकाचे फ्लॅटधारक डॉ. हेमंत दीक्षित त्यांच्या पत्नी अ‍ॅड. श्यामला दीक्षित यांनी हे अतिक्रमण केल्याचा आरोप रहिवाशांनी केला. सोसायटीतील मोकळी जागा या दांपत्याने बळकावली आहे. ड्रेनेज लाइनवरच बांधकाम केल्याने ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी सोसायटीमधील जिन्यालगत साचते. त्यामुळे डासही वाढले आहेत. एका रहिवाशाच्या मनमानीचा त्रास संपूर्ण सोसायटीला सहन करावा लागत असल्याचीही येथील रहिवाशांची तक्रार आहे. याबाबत जिल्हा सत्र न्यायालय बार कौन्सिल, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आदींसह सर्वच विभागांत सोसायटीतील नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.

तक्रार राजकीय हेतूनेच
-यासोसायटीची मी सभासदच नाही. त्यामुळे माझ्यावरील तक्रारींचा प्रश्नच नाही. केवळ राजकीय उद्देशानेच ही तक्रार केली आहे. याचा मला शारीरिक मानसिक त्रास होतो आहे. याबाबत मी इंदिरानगर पोलिसांत तक्रार केली आहे. अतिक्रमण माझे नाही. - अ‍ॅड.श्यामला दीक्षित, नागरिक

महिलांना अश्लील शिवीगाळ
-हेकुटुंब महिलांना अश्लील शिवीगाळ करत असते. दादागिरीसाठी गुंडांचा वापर केला जातो. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. त्यांच्यापासून जिवाला धोका आहे. नलिनीशहाणे, रहिवासी

कायद्याचे रक्षक की भक्षक?
-अतिक्रमणकरणारे स्वत: वकील आहेत. त्याचाच ते गैरवापर करतात. कारवाईस आलेल्या अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याच्या धमक्या देतात. सुनीताबेलापूरकर, रहिवासी