आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. हुसेन रुग्णालयात स्वतंत्र आरोग्य कक्ष, शंभर खाटांसाठी मुख्य वैद्यकीय अधिका-यांकडून प्रस्ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना चांगली आरोग्य सुविधा पुरविण्यात यावी, या हेतूने गोदाकाठाजवळ असलेल्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात स्वतंत्र आरोग्य कक्ष निर्माण करण्यात येणार असून, त्यात हायटेक यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
गेल्या सिंहस्थात सरदार चौकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे अनेक भाविकांना त्वरित उपचार मिळाल्याने जीव गमवावा लागला होता. आगामी सिंहस्थात काही आपत्ती ओढवल्यास उपचारांसाठी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेच्या जुने नाशिक येथील कथडा भागातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात स्वतंत्र आरोग्य कक्ष उभारण्यात येणार आहे. हे रुग्णालय रामकुंडापासून अत्यंत कमी अंतरावर असल्यामुळे आगामी सिंहस्थात सोयीच्या दृष्टीने येथे स्वतंत्र कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. या रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागासह शंभर खाटांचे मॅटर्निटी होम, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल, बालचिकित्सा विभाग, इन्क्युबेटर अशा सुविधा उपलब्ध राहाणार आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह सिंहस्थात येणाऱ्या भाविकांना उपचारांची सोय उपलब्ध होणार आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचे नूतनीकरण करून यात शंभर खाटांच्या आरोग्य कक्षासह विविध सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली.
सध्याअनेक विभाग बंद : जुन्यानाशकात महापालिकेच्या तीनमजली डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील अनेक विभाग सध्या बंद आहेत. या ठिकाणी दररोज हजारो रुग्ण उपचारांसाठी येतात. येथील ‘आयसीयू’ कक्ष शस्त्रक्रिया विभागही पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रुग्णालयात येणार हायटेक यंत्रणा
आगामीसिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात इंदिरा गांधी रुग्णालयात फिजिशियन, सर्जन, ऑर्थोपेडिक्स, न्यूरो सर्जन असे विशेष तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध व्हावेत म्हणून संबंधित प्रस्ताव देण्यात आला आहे. त्याबरोबरच रुग्णालयात हायटेक यंत्रणादेखील उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे सिंहस्थ कालावधीत आरोग्यसेवेला गती प्राप्त होण्याबरोबरच स्थानिकांनाही त्याचा लाभ होणार आहे.

वैद्यकीय प्रशिक्षण केंद्रालाही मंजुरी
दरम्यान,डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयासह इंदिरा गांधी रुग्णालयात वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे, असा प्रस्ताव मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, लवकरच या वैद्यकीय प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात येणार आहे. महापालिका रुग्णालयांच्या तुलनेत तज्ज्ञ डॉक्टरांना खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या रकमेचे मानधन मिळते. त्यामुळे त्यांच्याकडून खासगी रुग्णालयात नोकरी करण्यास प्राधान्य दिले जाते.
परिणामी, महापालिका रुग्णालयांना तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयासह इंदिरा गांधी रुग्णालयात वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे, असा प्रस्ताव देण्यात आले होते. त्यालादेखील मंजुरी मिळाली अाहे. लवकरच डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयासह इंदिरा गांधी रुग्णालयात वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
लवकरच मिळणार आधुनिक सुविधा
आगामीसिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आधुनिक सुविधा पुरविण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. तो मंजूरदेखील झाला आहे. त्यानुसार शस्त्रक्रिया विभागासह १०० खाटांचा स्वतंत्र आरोग्य कक्षही उभारला जाणार आहे. डॉ.राजेंद्र भंडारी, मुख्यवैद्यकीय अधिकारी