आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षा एमएसओ-ब्रॉडकास्टर्सच्या कराराची, स्टार चॅनल्ससाठी साधा संपर्क केबलचालकांशीच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- स्टारकंपनीने अला-कार्टे पद्धती लागू करत प्रत्येक चॅनलसाठी स्वतंत्र शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असून, हव्या असलेल्या चॅनल्सचा मागणी अर्ज केबलचालकांकडे देत शुल्क भरल्यास चॅनल तत्काळ सुरू करण्याची सुविधा एमएसओंनी (मल्टी सिस्टिम ऑपरेटर) उपलब्ध करून दिली आहे. मात्र, केबलचालकांना प्रतीक्षा आहे ती एमएसओ आणि ब्रॉडकास्टर्स यांच्यातील कराराची.
स्टार कंपनीच्या प्रत्येक चॅनलसाठी नोव्हेंबरपासून स्वतंत्ररीत्या शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे ज्यांनी ते शुल्क भरले नाही, अशांना स्टारची कुठलीही वाहिनी दिसत नाही. अनेक ठिकाणी स्वतंत्र चॅनल्ससाठी शुल्काची मागणी केली जात असल्याने हे चॅनल्स बंदच केले आहेत. परंतु, प्रत्येक चॅनलसाठी स्वतंत्र दर आकारल्यास केबलमध्ये गफलाच करता येणार नसल्याने सेवा देणारे स्वत:च या अला-कार्टेसाठी इच्छुक नाहीत. त्यामुळे ग्राहकांनाही त्याबाबत वरिष्ठ स्तरावरूनच चॅनल्स बंद केले जात असल्याचे सांगत यातून आपले अंग काढून घेण्याचे काम केले जात आहे. दुसरीकडे शहरातील चारही एमएसओंकडे असलेल्या अडीच लाख केबल ग्राहकांपैकी पाच हजारपेक्षा कमी ग्राहकांनी आपले मागणी अर्ज सादर केले आहेत. याचा विचार केल्यास स्टार कंपनीच्या चॅनल्सला ग्राहक पसंती देत नाही, असे सेवा देणाऱ्या यंत्रणेला जणू निदर्शनास आणून द्यावयाचे की काय, असाही यातून ग्राहकांनी अंदाज व्यक्त केला आहे.