आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘इंडिया सिक्युरिटी’त 16 वर्षांनंतर ‘कामगार’ची सत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- इंडिया सिक्युरिटी आणि करन्सी नोट प्रेस अंतर्गत वर्क्‍स कमिटीच्या द्विवार्षिक निवडणुकीत ज्ञानेश्वर जुंद्रे, जगदीश गोडसे यांच्या नेतृत्वाखालील कामगार पॅनलला तब्बल 16 वर्षांनंतर ‘इंडिया सिक्युरिटी’मध्ये सत्ता प्राप्त झाली आहे. तर करन्सी नोट प्रेसमध्ये सर्वाधिक जागा मिळूनही बहुमत हुकले. मतदारांनी अपक्षाच्या हाती सत्तेची किल्ली दिली.

सिक्युरिटी प्रेसमध्ये ‘कामगार’ला 8, तर आपला पॅनलला 4 जागा मिळाल्या. स्टाफ व इस्टेटमधून विजयी तीन सदस्य ‘कामगार’प्रणीत असल्याने कामगार पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले. कंट्रोल विभागात दगू खोले व भीमा नवाळे या दोघांना समान 440 मते मिळाली. नाणेफेकीचा कौल नवाळेंच्या बाजूने लागला. मात्र, आपला पॅनलच्या वतीने या प्रक्रियेवर हरकत घेण्यात आल्याने निकाल राखीव ठेवण्यात आल्याची माहिती ‘आपला’चे नेते अशोक गायधनी यांनी दिली.

विजयी उमेदवार : कंट्रोल विभाग (जागा-5) : बाळासाहेब चंद्रमोरे (आपला-559), सतीश निकम (आपला-532), दिनकर खुर्जल (कामगार-480), सुरेश लवांड (आपला-475), टेक्निकल (जागा-3) : भाऊसाहेब सूर्यवंशी (कामगार-425), जगदीश जाधव (कामगार-376), उल्हास भालेराव (कामगार-360), वर्कशॉप (जागा-3) : अशोक पेखळे (कामगार-478), राजाराम लहांगे (कामगार-473), सुभाष ढोकणे (कामगार-447), सीएसडी विभाग (जागा-1) : मच्छिंद्र मगर (आपला), स्टाफ (जागा-2) : दीपक खडांगळे (145), राहुल रामराजे (186), इस्टेट (जागा-1), शशी शिंदे (99).

करन्सी नोट प्रेसमध्ये एकुण 13 पैंकी कामगार पॅनलला 6 तर आपला पॅनलला 5 जागांवर विजय मिळाला. स्टाफ विभागातुन विजयी दोघा सदस्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या आल्या आहे.

विजयी उमेदवार : कंट्रोल विभाग (जागा-9), नंदु कदम (कामगार-821), योगेश कुलवदे (कामगार-658), सतिश चंद्रमोरे (कामगार-595), संजय गरकळ (कामगार-594), अनिल जाधव (आपला-688), सुनील ढगे (आपला-619), हरिभाऊ ढिकले (आपला-602), बाळासाहेब ढेरिंगे (कामगार-598), राजेंद्र शहाणे (आपला-816), टेक्निकल विभाग (जागा-2), गणेश पर्वते (कामगार-245), दिलीप क्षिरसागर (आपला-249) विजयी झाले. स्टाफच्या दोन जागांवर रविंद्र गोजरे (132) गणेश कळमकर (113) विजयी झाले. ते ज्या पॅनलच्या बाजुने कौल देतील त्यांची करन्सी प्रेस मध्ये सत्ता येईल.

लोकमताचा कौल मान्य
लोकमताचा कौल मान्य आहे. विरोधकांनी मतदारांना खोटी आश्वासने दिली. योग्यवेळी कामगार मतदारांना फसवणूक झाल्याची जाणीव होईल. -अशोक गायधनी, नेते, आपला पॅनल

अपेक्षित मतदान नाही
आयएसपीमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले, मात्र करन्सीत अपेक्षित मतदान मिळाले नाही. त्यामुळे स्पष्ट बहुमत मिळाले नाही. जगदीश गोडसे, नेते, कामगार पॅनल

आश्वासने पूर्ण केली
मजदूर संघ निवडणुकीत कामगार पॅनलने दिलेली आश्वासने अवघ्या दीड वर्षात पूर्ण केल्याने मतदारांनी 16 वर्षांनंतर ‘कामगार’च्या हाती सत्ता सोपवली. कार्यकर्त्यांच्या पर्शिमामुळे हे शक्य झाले. ज्ञानेश्वर जुंद्रे, नेते, कामगार पॅनल