आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूर देशी गेले जरी माझे बाबा.. माझ्या पाठी आधार नवा उभा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भारतीय जैन संघटनेने अात्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या २८ कुटुंबांतील मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या पोषणाची जबाबदारी घेतली आहे. या मुलांना सोमवारी पुण्याच्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प येथे पाठवण्यात आले. परक्यांनी आपलेसे केलेल्या मुलांना या उज्ज्वल वाटेवर जाताना पाहून त्यांच्या कुटुंबीयांसह उपस्थितांचेही अश्रू दाटले होते.
दुष्काळ, कर्ज वा इतर कारणांमुळे गेल्या दीड ते दोन वर्षात जिल्ह्यात ११४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अशा कुटुंबातील मुलांचे पोषण, शिक्षण तसेच एकूण भविष्यासाठी भारतीय जैन संघटनेने मदतीचा हात दिला आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त २८ कुटुंबांतील मुला-मुलींना दत्तक घेऊन वाघोलीच्या शाळेत पाठवले. त्यात वी ते १२ वीचा शिक्षणाचा खर्च, शैक्षणिक साहित्य, राहण्याची व्यवस्थेसह आणि पोषक संस्कारांत त्यांना वाढविले जाणार आहे. संघटनेच्या पुढाकाराने राज्यातून यंदा ३३० विद्यार्थ्यांना याप्रसंगी या शाळेत रवाना करण्यात आले.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये नैराश्य येता त्यांचे भविष्य घडावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कालिका मंदिर सभागृहात छाेटेखानी कार्यक्रमात आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार राजाभाऊ वाजे, विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, कवी प्रदीप गायकवाड, उपमहापौर गुरमित बग्गा, नगरसेविका योगीता आहेर, नगरसेवक सचिन महाजन, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, कालिका मंदिर ट्रस्टचे केशव पाटील यांच्यासह भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

खंबीरपणेमुलांच्या पाठीशी उभे रहा...
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुंटुंबीयांना यावेळी मार्गदर्शन करताना विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. कुंटुंबीयंानी आता हिंमत हारता खंबीरपणे मुलांच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याचे संागितले. तसेच नैराश्य दूर करत मुलांनी आलेल्या संधीचे सोने करावे असे सांगितले. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, उपमहापौर गुरमित बग्गा यांनीही उपस्थिताना ‘हिंमत हारता परिस्थितीचा सामना करा’ असे सांगत आधार दिला.

एकीकडे पाठीराख बाप गेल्याचे दु:ख, त्याच्या आठवणी.. तर दुसरीकडे माणुसकीची साथ अशा कडू आणि गोड भावना सांभाळत पाल्यांनी आपल्या घरच्या लोकांना निरोप दिला. तेव्हा सारे वातावरणच भावुक झाले होते.

शिकून पोलिस बनणार
^वडील गेल्याचेदु:ख खूप मोठे आहे. पण आता भारतीय0 जैन संघटनेच्या मदतीने खूप शिकणार आहे. खूप अभ्यास करणार आहे आणि पोलिस बनणार आहे. - शीला अारोटे, विद्यार्थिनी

मुख्यमत्र्यांसोबत स्वागत
वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प येथे १५ जूनला राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित स्वागत समारंभ होणार आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

दिला जगण्याचा आधार
^कर्त्यापुरुषाने तीनच महिन्यापूर्वी आत्महत्या केली. आधारचा हरवला होता. मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला होता. जैन संघटनेच्या या उपक्रमाने मोठा आधार दिला आहे. - सविता बोडके, सिन्नर

..अन् पाणावले सगळ्यांचेच डोळे
घरातील कर्त्या पुरुषााने आत्महत्या केल्याने निराधार झालेले कुटुंब... मुलांचे संगोपन कसे करायचे, याची सततची चिंता... मनात आपणही आत्महत्या करू असा नैराश्याने ग्रासलेला विचार. अशा परिस्थितीत भारतीय जैन संघटनेने त्या कुटुंबीयांना मदतीचा हात दिल्याने, तसेच त्यांच्या मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी उचचली आहे. कालिका मंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या औपचारिक कार्यक्रमात उपस्थित पालकांचे, मुलांचे आणि पाहुण्यांचे देखील डोळे पाणावले होते. पुण्याकडे रवाना होताना पालकांनी उज्ज्वल भविष्यासाठी अाशीर्वाद देत पाल्यांना पुढील प्रवासासाठी रवाना केले.

उपक्रमासाठी यांचे विशेष प्रयत्न
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर सांखला, प्रफुल पारख, दीपक चोपडा, जयप्रकाश आचलिया, नाशिक विभागीय अध्यक्ष सतीश बोरा, संदीप कटारिया, सतीश दुगरवाल, संतोष कोटेचा, संतोष संकलेचा, संतोष दुगड आदी पदाधिकारी, सदस्यांनी संपूर्ण जिल्ह्यात सरकारी नोंद असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला.