आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Mars Mission News In Marathi, Divya Marathi, ISRO

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळस्वारीचे यश दृष्टिपथात...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अंतराळ संशोधनाच्या मानवी इतिहासातील भारताच्या अद्वितीय यशाची प्रतीक्षा अवघी काही तासांची उरली आहे. पहिल्याच प्रयत्नात हे यान राष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी (दि. २४ सप्टेंबर) सकाळी ७ वाजून ४१ मिनिटांनी ग्रहावर उतरेल. अमेरिका आणि रशियाला पहिल्या मोहिमेत जे यश मिळविता आले नाही.
त्याची नोंद करण्यात इस्रोचे चेअरमन राधाकृष्णन, प्रोजेक्ट इनचार्ज अण्णादुराई यांची टीम यश प्राप्त करेल, तो क्षण सुवर्णाक्षरांनी नोंदविला जाणार आहे. यानाच्या कक्षेतील प्रवेशाचे थेट प्रक्षेपण सकाळी ६.४५ पासून सुरू होईल. या यानाच्या प्रवासातील अंतिम टप्पा कसा असेल, याची माहिती अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या नाशिकमधील स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी खास ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी दिली आहे.

यान आज मंगळावर; महत्त्वाचे टप्पे असे
7.17 वाजता होईल वातावरणात प्रवेश
300 दिवस होती इंजिन बंद
440 लॅम इंजिन क्षमता
24 मिनिटे सुरू राहील इंजिन
30 मिनिटे यान असेल मंगळाच्या वातावरणात
20 मिनिटे असेल संपर्कयंत्रणा बंद
7.47 वाजता उतरेल यान

ऐतिहासिक क्षणाची उत्कंठा शिगेला
^मानवरहित अंतराळयान मंगळ ग्रहावर उतरण्याच्या क्षणाची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. तेथील जमिनीचे नमुने गोळा करणे. त्यातील व वातावरणातील लोहाचे प्रमाण निश्चित करणे. तेथे पाणी किंवा मिथेन वायू आहे का, याचा शोध घेणे. आणि पूर्वी तेथे जीवसृष्टी होती की नाही, याचा शोध घेणे या मोहिमेद्वारे शक्य होईल.
अपूर्वा जाखडी, स्पेस एज्युकेटर, नासा