आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Medical Association And Divya Marathi Activities In Nashik

आजपासून शहरात होणार रक्तसंकलनाचा जागर; तीन जणांना जीवदान आणि अंधांना दृष्टीही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘दैनिक दिव्य मराठी’, इंडियन मेडिकल असाेसिएशन, जीवन रक्तपेढी आणि डाॅ. वसंतराव पवार मेडिकल काॅलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारपासून, १२ ते १९ एप्रिलदरम्यान रक्तदान अभियान आयोजित करण्यात अाले अाहे. भाभानगर येथील नवशक्ती चाैकातील नाईस मेडिकल (रिग्लेज अाॅर्बिट) येथे अभियानातील पहिले शिबिर हाेत असून, रविवारी (दि. १२) दुपारी ते वाजेपर्यंत येथे परिसरातील इच्छुकांना रक्तदान करता येणार अाहे.

उन्हाळ्यात रक्तपेढ्यांना जाणवणाऱ्या रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी अाणि या काळात गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील तरुण मंडळे, गणेशाेत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था, उद्याेग अाणि व्यावसायिक अास्थापनांचा चांगला प्रतिसाद या अभियानाला िमळत असून, नागरिक स्वयंस्फूर्तीने त्यात सहभागी हाेत अाहेत.
उन्हाळ्यात सुट्या असल्याने तीर्थाटन, पर्यटनासाठी जास्त प्रवास केला जात असल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्या अाणि अपघातांचे प्रमाणही वाढते. रक्ताची मागणीही वाढते. मात्र, नेमक्या याच काळात महाविद्यालयांत परीक्षा सुट्या असतात. त्यामुळे रक्तसंकलनही घटते. रक्त कृत्रिमरीत्या उपलब्ध हाेत नसल्याने मागणी पुरवठ्यातील ही तफावत भरून काढण्यासाठी रक्तपेढ्यांना माेठ्या प्रमाणावर कसरत करावी लागते. या समस्येवर मात करण्यासाठी या अवघड काळात स्वेच्छेने रक्तदानास पुढे यावे, असे अावाहन या अभियानाद्वारे करण्यात अाले अाहे.
एक काॅल करा अाणि उपक्रमात सहभागी व्हा...
याउपक्रमांतर्गत १९ एप्रिलपर्यंत रक्तदान शिबिराचे अायाेजन करण्यात येईल. ‘दिव्य मराठी’ने गत अाठवड्यात या उपक्रमात सहभागी हाेण्याबाबत अावाहन केल्यानंतर अनेक संस्था, मंडळे पुढे अाली अाहेत. अापण, अापले मंडळ-संस्था सहभागी हाेऊ शकतात. अधिक माहितीसाठी डाॅ. राजेश कुचेरिया 9823025292, जीवन रक्तपेढी ९६०४४९६०४४ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.
उद्या ‘दिव्य मराठी’त शिबिर
‘दिव्यमराठी’नेही या अभियानात सक्रिय सहभागी हाेत सामाजिक दायित्व म्हणून साेमवारी (दि. १३) रक्तदान शिबिराचे अायाेजन केले अाहे. सकाळी ११ ते दुपारी वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात ‘दिव्य मराठी’च्या कर्मचाऱ्यांसह वाचकही सहभागी हाेऊ शकतील.
‘रेस अॅक्राॅस अमेरिका’ या जगातील सर्वात कठीण मानल्या गेलेल्या अतिशय प्रतिष्ठेच्या सायकलिंग स्पर्धेसाठी यावर्षी पात्र ठरलेल्या डाॅ. महाजन बंधूंना पाठिंबा देण्यासाठी अंधांना दृष्टी देण्याच्या कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या उद्देशाने हे अभियान आयोजित करण्यात आले अाहे. आजपर्यंत एकही भारतीय ही स्पर्धा पूर्ण करू शकलेला नाही. या स्पर्धेत डाॅ. महाजन बंधू यशस्वी झाल्यास देशासाठी ती अभिमानाची गोष्ट असेल. त्यात याेगदान देणाऱ्या नाशिकचा ताे माेठाच बहुमान ठरेल. या अभियानात संकलित होणाऱ्या प्रत्येक रक्तपिशवीमागे १५० रुपये महाजन बंधू दृष्टिदानासाठी कल्पतरू फाऊंडेशनला दिले जाणार आहेत. या अभियानात रक्तदान करून, रक्तदाता तीन रुग्णांचे प्राण वाचवण्यात तसेच अंधांना दृष्टी देण्यात मदत करू शकेल.