आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवळालीतील वास्तव्याने जीवनाची जडणघडण, ‘मिस युनिव्हर्स’ची भारतीय स्पर्धक श्रद्धाच्या भावना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जागतिक पातळीवरची सगळ्यात मोठी सौंदर्य स्पर्धा म्हणून मान असलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रद्धा शशिधरने नाशिकविषयीच्या विशेष आठवणी सांगितल्या. 
 
मूळची तमिळ असणारी श्रद्धा देवळाली येथील लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शाळेत शिकली आहे. नाशिकमधील वास्तव्याविषयी पत्रकार परिषदेत तिने सांगितले की, या परिसरातील शिस्त अाणि शाळेत झालेल्या जडणघडणीबराेबरच मास कम्युनिकेशनची पदवी हा तिच्या आयुष्यातील बदल घडविणारा महत्त्वाचा भाग ठरला. स्कूबा डायव्हिंग, ट्रेकिंग, बाइक रायडिंग, मॅरेथॉनसारख्या खेळांमध्ये ती अग्रेसर आहे. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील लास वेगास येथे ही स्पर्धा होणार आहे. देशातील १४ स्पर्धकांमधून तिची निवड झाली आहे. 
 
मुलींनी लष्करात जावे... 
मिसयुनिव्हर्स स्पर्धेतील स्पर्धक असली तरी श्रद्धा मुलींना भारतीय संरक्षण दलामध्ये दाखल होण्याचे आवाहन करते. स्वत:देखील याच सेवेत रुजू होण्याचे लक्ष्य तिने समोर ठेवले आहे. भारतामध्ये असलेल्या सगळ्यात मानाच्या आणि अभिमानाच्या नोकरीची संधी यानिमित्ताने मिळते, असे मत तिने व्यक्त केले. 
बातम्या आणखी आहेत...