आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय तत्त्वज्ञान श्रेष्‍ठच- जयंत सहस्त्रबुद्धे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- स्वामी विवेकानंदांनी 120 वर्षांपूर्वी अमेरिकेत जाऊन मांडलेला भारतीय तत्त्वज्ञानातील सैद्धांतिक विचार हा अवघ्या जगाला मार्गदर्शक व तारक ठरला आहे. विज्ञानावर विलक्षण र्शद्धा असणार्‍या जगज्जेत्यांना त्यांचे विचार आजही प्रेरणादायी ठरत आहेत. भारतीय तत्त्वज्ञानातील विचारांतून जग जिंकणार्‍या स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करतानाच नव्या पिढीने वैज्ञानिकता जोपासण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विज्ञानभारतीचे राष्ट्रीय संघटक सचिव जयंत सहस्त्रबुद्धे यांनी येथे केले.
गंगापूररोड येथील शंकराचार्य न्यास संकुल सभागृहात कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या जयंतीनिमित्ताने कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्था संचलित क. का. वाघ महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयातर्फे ‘स्वामी विवेकानंद आणि विज्ञान’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सहस्त्रबुद्धे बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, उपाध्यक्ष काशीनाथदादा टर्ले, महाविद्यालयाच्या प्राचार्या विद्या खपली, प्राचार्य केशव नांदूरकर, शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष राजाभाऊ मोगल आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, स्वामी विवेकानंदांनी भारतीय तत्त्वज्ञानाच्या आधारे विज्ञानाशी सांगड घालत नवीन कल्पना मांडल्या. स्वामीजींच्या विचारांनी अनेकांना प्रभावित करून आपल्याकडे आकर्षिक केले. आधुनिक विज्ञानातील अनेक शास्त्रज्ञांच्या थेरी (संशोधन) हे स्वामींच्या सैद्धांतिक विचारांवर आधारित असल्याचे त्यांनी अनेक उदाहरणांतून सांगितले. आयुर्वेद, उत्क्रांती, सृष्टीची उत्पत्ती अशी उदाहरणे देत स्वामी विवेकानंदांच्या वैज्ञानिक दृष्टीची माहिती त्यांनी दिली. ‘संकोच आणि विकास’ हे एक सतत चालणारे चक्र असून, ते एक कल्प आहे. वैदिक तत्त्वज्ञानाला विज्ञानाचं अधिष्ठान प्राप्त करून देत स्वामीजींनी भौतिक प्रगतीच्या कल्पनांचे भाकीत शेकडो वर्षांपूर्वी मांडले होते. त्यांचे वैज्ञानिक विचार आजच्या युवकांनी आत्मसात करून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केली.